शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

कालिदास महोत्सवातून होणार  ‘परंपरेचा आविष्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:18 AM

उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार  ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वारे भारतीय संगीत परंपरेतील शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी नागपूरकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या भट सभागृहात २७ पासून सोहळा : शास्त्रीय गायन, वादन, नृत्याची मेजवानी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरलेल्या कालिदास महोत्सवाचे आयोजन येत्या २७, २८ व २९ नोव्हेंबरला कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे होणार आहे. परंपरेचा नवा आविष्कार  ठरलेल्या या महोत्सवात मातब्बर अशा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कलावंतांद्वारे भारतीय संगीत परंपरेतील शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्याची मेजवानी नागपूरकरांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे.समृद्ध अशा विदर्भाच्या सांस्कृतिक वारशाकडे लक्षवेध करणे व पूर्व विदर्भ आणि नागपूर शहर राष्ट्रीय स्तरावर प्रमुख सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून स्थापित व्हावे, या उद्देशाने कालिदास महोत्सव आयोजन समिती, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व नागपूर महानगरपालिकेच्या सौजन्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा महोत्सव ‘शकुंतला-भारतीय स्त्रीचे सूर’ या कवि कालिदास यांच्या कालजयी ग्रंथांचा आधार घेऊन करण्यात आला आहे. महोत्सवामध्ये २७ नोव्हेंबर रोजी अनुराधा पाल यांचे ताल वाद्य वृंद तसेच ख्यातकीर्त शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर यांचे शास्त्रीय गायन होईल. २८ नोव्हेंबर रोजी पद्मश्री देवयानी यांचे भरतनाट्यम् नृत्य व कौशिकी चक्रवर्ती या कौशिकी आणि सखी या लोकप्रिय कार्यक्रमाचे सादरीकरण करतील. समारोपाच्या दिवशी संगीता शंकर यांचे व्हायोलिन वादन तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका परवीन सुलताना यांचे गायन आयोजित करण्यात आले आहे. कानामनाला तृप्त करणारी सांस्कृतिक मेजवानीच रसिकांना या माध्यमातून मिळणार आहे.

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवnagpurनागपूर