शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास महोत्सव : परवीन सुलताना यांच्या स्वरांनी उबदार झाली रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 01:24 IST

‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.

ठळक मुद्देसुरांच्या अत्युच्च शिखरावर कालिदास महोत्सवाची सांगता

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘हमे तुमसे प्यार कितना...’ आणि पाकीजासह अनेक चित्रपटातील गीतांच्या आठवणींचा ठेवा. या आठवणींसह जगविख्यात गायिका बेगम परवीन सुलताना यांचे स्वरमाधुर्य ऐकण्याची, सामावून घेण्याची प्रतीक्षा आधीच श्रोत्यांना लागली होती. त्यांनीही स्वरगंधाची उधळण करून श्रोत्यांना काबीज केले आणि सुरांच्या अत्युच्च शिखरावर तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कालिदास महोत्सवाची सांगता झाली.शास्त्रीय संगीतासह उपशास्त्रीय ठुमरी, दादरा असे रसिले प्रकार व हिंदी सिनेमातील पार्श्वगायनासह घराघरात पोहचलेल्या या पद्मभूषण परवीन यांचा खास चाहता वर्ग सर्वदूर पसरलेला आहे. त्यामुळे बऱ्याच काळानंतर पुन्हा त्यांच्या स्वरांची गोड अनुभूती घेण्यासाठी रसिकांनी सुरेश भट सभागृहात प्रचंड गर्दी केली होती. आसाम ही जन्मभूमी व मुंबई-महाराष्ट्र ही कर्मभूमी मानणाऱ्या बेगम परवीन यांनी सुरुवातीलाच चोखंदळ रसिक अशी ओळख असलेल्या नागपूरकर रसिकांच्या प्रेमाचे आभार मानत ‘राग मारुविहाग’ने त्यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. बालवयापासून नाद व सुरांच्या उद्यानात बागडणाऱ्या परवीन सुलताना यांच्यात पतियाळा व किराणा घराण्याच्या संमिश्र स्वरांची रागिणी वाहते. तीनही सप्तकात सहज फिरणारा गाजदार स्वर, लहान-मोठ्या तानांची वर्तुळे व सरगमची उधळण त्यांनी रसिकांवर केली. विलंबित एकतालातील ‘कैसे विन साजन...’ व द्रुत तीन तालातील ‘गवन न किजो...’ या बंदिशीसह त्यांनी रागविस्तार केला. पुढे राग ‘मालुहामांड’मध्ये झपतालातील बंदिश व तीन तालातील तराणा अशांसह त्यांनी आपले गायन कळसाला पोहचविले. खास श्रोत्यांच्या आग्रहावर मिश्र तिलंग रागातील ‘रसिका तुझ्याचसाठी मी एक गीत गाते...’ ही मराठीतील रचना त्यांनी सादर करून बहारदार समापन केले.त्यांना तबल्यावर मुकुंदराज देव, हार्मोनियमवर श्रीनिवास आचार्य, तानपुऱ्यावर ऋतुजा व शीतल यांनी सुरेल साथसंगत केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सुरेख निवेदन श्वेता शेलगावकर आणि रेणुका देशकर यांनी केले. ध्वनिसंयोजन संदीप बारस्कर यांचे होते.गडकरी यांच्या संदेशाने हृदय समापनकालिदास महोत्सवाच्या समापनाच्या औपचारिक कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, महाराष्ट्र पर्यटन मंडळाचे एमडी अभिमन्यू काळे, आयकर सहआयुक्त मुरारे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडीओद्वारे संदेश दिला. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कलावंतांच्या सादरीकरणाने हा महोत्सव देशभर परिचित झाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले. महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग यांनी आभार मानले.

 

टॅग्स :Kalidas Festivalकालिदास महोत्सवmusicसंगीत