काबूल दहशतीचे पडसाद नागपुरातही; अफगाणमधील अराजकतेने वाढली ‘त्यांची’ धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 10:22 AM2021-08-17T10:22:27+5:302021-08-17T10:23:13+5:30

नागपुरात सुमारे ९५ अफगाणी नागरिक आहेत. त्यातील काही जणांना पाच, काहींना सात तर काहींना १० वर्षे झाली आहेत. ते शरणार्थी म्हणून येथे राहतात.

Kabul terror reverberates in Nagpur | काबूल दहशतीचे पडसाद नागपुरातही; अफगाणमधील अराजकतेने वाढली ‘त्यांची’ धडधड

काबूल दहशतीचे पडसाद नागपुरातही; अफगाणमधील अराजकतेने वाढली ‘त्यांची’ धडधड

Next

नरेश डोंगरे/अयाझ शेख

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : बरबाद कर दिया हमारे देश को उन जालिमोने

मै इधर हूं, माँ उधर है।

और कल जब बात हुई तो,

माँ का सवाल था... बेटा तू तो मजे मे है?

“भाईजान... कुछ नही बोलना हमे... चाहे तो सजा दे दिजिए... पर कोई सवाल मत पूछिये. हमारी फॅमिली वहाँ पर है। कल से बात नही हो पा रही। पता नही किस हाल मे है वो. हमने इधर कुछ बोल दिया और मीडिया मे खबर बन गयी तो पता नही वो (तालिबानी) उधर हमारे लोगों पर क्या कहर बरसायेंगे. शैतान है वो (तालिबानी). दुआ करो हमारे बंदों (फॅमिली) के साथ कही कुछ ऐसा वैसा न हो...” ही भावना आहे नागपुरातील अफगाणी नागरिकांची. (Effect of Kabul reverberates in Nagpur, Afganistan Talibaan )

नागपुरात सुमारे ९५ अफगाणी नागरिक आहेत. त्यातील काही जणांना पाच, काहींना सात तर काहींना १० वर्षे झाली आहेत. ते शरणार्थी म्हणून येथे राहतात. २०-२५ जण भारतभ्रमण, वैद्यकीय कारणाने नागपुरात आले आहेत. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ते वास्तव्याला आहेत.

त्यातील काहींच्या व्हिसाची मुदत संपण्याच्या मार्गावर आहे. त्यांना परतीचे वेध लागले असतानाच अफगाणिस्तानमध्ये राजकता निर्माण झाली. त्यामुळे नागपुरात टुरिस्ट, मेडिकल व्हिसावर आलेले सगळे अस्वस्थ झाले आहेत. तालिबान्यांच्या क्राैर्याची कल्पना असल्याने त्यांची अस्वस्थता टोकाला पोहोचली आहे. नातेवाइकांना फोनही लागत नसल्याने ते प्रचंड दहशतीत आले आहेत. टीव्हीला चिकटून बसले आहेत. काहींना ‘लोकमत’ने बोलते केले. मात्र, आपण पत्रकारांशी बोलतो आहोत, हे लक्षात आल्यानंतर ते विचलित झाले. पाहिजे तर आम्हाला कारागृहात टाका; परंतु तेथील परिस्थितीची माहिती विचारू नका, अशी विनवणी ते करू लागले.

पाकिस्तानवर प्रचंड रोष

कधी काळी कलाकुसर, शाही खानपान आणि पेहरावासाठी आमचा देश ओळखला जायचा. अलीकडे मात्र आतंक अन् आक्रोशच अफगाणच्या वाट्याला आला आहे. या स्थितीला पाकिस्तानच कारणीभूत असल्याची संतप्त भावनाही ही मंडळी व्यक्त करीत आहेत. भारतात आम्हाला आपल्या लोकांसोबत असल्याची अनुभूती मिळते. भरतीय नागरिक फारच सहृदय असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

एक वर्षापूर्वी अफगाणिस्तानला नातेवाइकांच्या भेटीला गेलो होतो. तेव्हा ठरल्याप्रमाणे नातेवाईक या महिन्यात नागपुरात येणार होते; परंतु आता निर्माण झालेल्या स्थितीमुळे पत्नी व मुले काबूलमध्ये तर इतर नातेवाईक पक्तिकामध्ये अडकले आहेत. त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- खांगुल मोहम्मदी

तालिबानच्या हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमधील सर्व व्यवसाय बंद झाले. त्यामुळे नातेवाइकांकडील पैसे संपले आहेत. त्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यांना नागपुरातून पैसे पाठविण्याचा मार्गही उपलब्ध नाही. त्यामुळे परिस्थिती शांत होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

- अर्झ मोहम्मद

Web Title: Kabul terror reverberates in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.