ज्योती वजानी यांना दोन वर्षे मुदतवाढ
By Admin | Updated: June 17, 2016 03:20 IST2016-06-17T03:20:37+5:302016-06-17T03:20:37+5:30
राज्याच्या विधी व न्याय विभागाने नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सरकारी वकील ज्योती वजानी यांना पुन्हा दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे.

ज्योती वजानी यांना दोन वर्षे मुदतवाढ
नागपूर : राज्याच्या विधी व न्याय विभागाने नागपूर जिल्हा न्यायालयाच्या सरकारी वकील ज्योती वजानी यांना पुन्हा दोन वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. वजानी या २० जून रोजी निवृत्त होणार होत्या. शासनाला त्यांच्या सेवेची आणखी गरज असल्याने बुधवारी अधिसूचना जारी करून त्यांना आणखी दोन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती देण्यात आली. वजानी यांनी नुकताच युग चांडक अपहरण व खून खटला यशस्वीपणे चालविला. त्यांच्यामुळे या प्रकरणातील दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. सरकारने युग चांडक प्रकरणातच उच्च न्यायालयातही सहाय्य म्हणून त्यांची सेवा घेतली. त्यामुळे राजेश दवारे आणि अरविंद सिंग या दोन्ही आरोपींची फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली.वाडीतील मुस्कान शर्मा बलात्कार व खून प्रकरणाचा खटलाही त्यांनी मोठ्या जिकरीने लढला होता. (प्रतिनिधी)