शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 21:46 IST

न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली.

ठळक मुद्देनागपूर पोलिसांची स्पष्टोक्ती : सखोल चौकशीनंतरच तपास बंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायमूर्ती ब्रजगोपाल लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला होता. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आलेल्या शवविच्छेदन व फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात आलेल्या तपासणीत त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे, अशी माहिती नागपूरचे सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी दिली. बोडखे म्हणाले की १ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी एका खासगी रुग्णालयात ब्रजगोपाल लोया यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉ. प्रशांत राठी यांनी पोलिसांना दिली होती. डॉ. राठी यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी त्यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मेडिकलला पाठविले होते.न्यायमूर्ती लोया हे नातेवाईकाच्या लग्नासाठी नागपुरात आले होते. ते रविभवन येथे थांबले होते. पहाटे त्यांच्या छातीत अचानक वेदना सुरू झाल्याने, त्यांना खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयात ईसीजी के ल्यानंतर त्यांना हार्टअटॅक आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लगेच त्यांना दुसºया खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर, पोलिसांना पंचनामा तयार करण्यासाठी, मृताची ओळख व पुष्टी करण्यासाठी तसेच शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव स्वीकारण्यापर्यंत डॉ. प्रशांत राठी यांनी मदत केली होती.बोडखे म्हणाले की, रविभवन हे सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने, तिथे आकस्मिक मृत्यूची नोंद करून त्यांचे पार्थिव न्यायमूर्ती लोया यांच्या मूळ गावी लातूर येथे पाठविण्यात आले होते. पार्थिवासोबत दोन सहकारी व एका पोलीस कर्मचाºयाला पाठविले होते. सदर पोलिसांनी ईसीजी करणाºया चिकित्सकाचा रिपोर्ट व ज्या रुग्णालयात त्यांना मृत घोषित केले, त्या रुग्णालयात झालेल्या उपचारासंदर्भातील दस्तावेजाची तपासणी केली. या तपासणीत न्यायमूर्ती लोया हे हृदयरोगाने ग्रस्त असल्याचे दिसून आले. शवविच्छेदनाच्या अहवालातही ‘कोरोनरी इन्सफिसेंसी’ यामुळे लोया यांचा मृत्यू झाल्याचे नमूद आहे. पोलिसांनी शवविच्छेदनानंतर विसेरा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविला होता. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातही न्यायमूर्ती लोया यांच्या शरीरात कुठलेही विषारी पदार्थ आढळले नाही. शवविच्छेदनाचा अहवाल व फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टच्या आधारावर सदर पोलीस न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराचे झाल्याच्या निष्कर्षावर पोहचले होते. परंतु न्यायमूर्ती लोया यांचे प्रकरण पोलिसांकडून बंद करण्यात आले, असा आरोप करण्यात येत होता. या आरोपाचे खंडन करताना बोडखे म्हणाले की, पोलीस या प्रकरणात सखोल चौकशी करून, अंतिम निष्कर्षावरही पोहचले होते.

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू