‘आपली बस’ सक्षमिकरणाच्या नुसत्या घोषणाच!..जोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:07 IST2020-12-06T04:07:54+5:302020-12-06T04:07:54+5:30
परिवहन समितीच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तिकीट व अन्य मार्गातून १२० कोटीचे उत्पन्न होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. ...

‘आपली बस’ सक्षमिकरणाच्या नुसत्या घोषणाच!..जोड
परिवहन समितीच्या २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तिकीट व अन्य मार्गातून १२० कोटीचे उत्पन्न होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला होता. यात प्रवासी दंडातून ८६ लाख, वाहन दंडातून ४० लाख, प्रवासी पास मधून ७ कोटी, त्रैमासिक पासमधून १ कोटी गृहीत धरण्यात आले. ७ ते ८ महिने बस सेवा बंद होती. त्यात अजूनही बस पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाही. अशा परिस्थितीत १२० कोटी उत्पन्नाचे उद्दिष्ट अशक्य आहे. मागील दोन वर्षातील घोषणा कागदावरच राहणार असल्याचे चित्र आहे.
....
२०१९ च्या अर्थसंकल्पातील घोषणा
-शहरात ४३१ बस धावतील
-सर्व बसेस सीएनजीवर धावतील
-कोराडी व वाठोडा बस डेपो
-बस थांब्यावर वॉटर एटीएम
-११६ बस स्थानकांची निर्मिती
......
२०२० च्या अर्थसंकल्पातील घोषणा
-शहरात ४३६ बस धावतील
-वाठोडा व मोरभवन डेपो निर्माण
-बस थांब्यावर वॉटर एटीएम
-भंगार बसचे ई-टॉयलेट मध्ये रुपांतर
-१३२० बस स्थानकांची निर्मिती