जीवनदायी आरोग्य योजना ठप्प
By Admin | Updated: September 16, 2015 03:30 IST2015-09-16T03:30:58+5:302015-09-16T03:30:58+5:30
गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलमध्ये गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे.

जीवनदायी आरोग्य योजना ठप्प
गरीब रुग्ण अडचणीत : १५ दिवसांपासून औषध, शस्त्रक्रियाच्या साहित्याची प्रतीक्षा
नागपूर : गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना मेडिकलमध्ये गेल्या १५ दिवसांपासून ठप्प पडली आहे. योजनेतील लाभार्थ्यांना औषध व शस्त्रक्रियेचे साहित्य उपलब्ध होणे बंद झाल्याने रुग्ण अडचणीत आला आहे. यात रुग्णाच्या जीवाला धोका झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) व दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) नागरिकांच्या जटील आजारांच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी शासनाने २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुरू केली. या योजनेत जटील शस्त्रक्रियांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येते.