‘जम्पिंग’वर होणार वादळी चर्चा

By Admin | Updated: May 13, 2014 01:00 IST2014-05-13T01:00:05+5:302014-05-13T01:00:05+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला हैराण करणार्‍या ‘जम्पिंग’च्या मुद्यावर विद्वत परिषदेच्या मंगळवारी होणार्‍या

'Jumping' will be a stormy discussion | ‘जम्पिंग’वर होणार वादळी चर्चा

‘जम्पिंग’वर होणार वादळी चर्चा

नागपूर विद्यापीठ : आज विद्यापीठाच्या विद्वत परिषदेची बैठक

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ प्रशासनाला हैराण करणार्‍या जम्पिंगच्या मुद्यावर विद्वत परिषदेच्या मंगळवारी होणार्‍या बैठकीदरम्यान वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत. परिषदेतील सदस्य या मुद्यावर दोन गटांत विभागल्या गेले आहेत. हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेने विद्वत परिषदेकडे वर्ग केला होता. जम्पिंगनाकारल्याच्या मुद्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याचे पडसाद राज्याच्या राजकीय पटलावरदेखील उमटल्याने या मुद्याला गंभीरतेने घेण्यात येत आहे. जम्पिंगच्या अध्यादेशावर व्यवस्थापन परिषदेत फेरविचार तसेच परत चर्चा करण्यात यावी, असे निर्देश राज्यपाल कार्यालयाने दिले होते. त्यानुसार २६ एप्रिल रोजी व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली व या बैठकीदरम्यान हा मुद्दा विद्वत परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार १३ मे रोजी विद्वत परिषदेची बैठक होणार आहे. यात जम्पिंगच्या अध्यादेशावर फेरविचार करून सुधारणांसंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे. जम्पिंगच्या मुद्यावर विद्वत परिषदेचे सदस्यांचे दोन गट तयार झाले आहेत. विरोध करणार्‍या सदस्यांचे मत आहे की जर जम्पिंगला ग्रीन सिग्नलमिळाला तर शैक्षणिक गुणवत्तेवर याचा परिणाम होईल.

नागपूर विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांंना

काय आहे मुद्दा?

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या जुन्या अभ्यासक्रमातील सातत्याने अनुत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांंनी उन्हाळी २0१४ च्या परीक्षेला बसण्याची मागणी लावून धरली होती. त्यासाठी विद्यापीठात वारंवार आंदोलने झाली . विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने अभियांत्रिकीच्या या विद्यार्थ्यांंना परीक्षेत बसू देण्याचा निर्णय घेतला होता. या अध्यादेशाला व्यवस्थापन परिषदेच्या मंजुरीनंतर राज्यपालांकडे मान्यतेसाठीदेखील पाठविण्यात आले होते. परंतु राज्यपाल कार्यालयाने यावर ताशेरे ओढले. विद्यापीठाने नेमलेल्या समितीच्या अहवालानुसार या विद्यार्थ्यांंना यंदाची उन्हाळी परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: 'Jumping' will be a stormy discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.