शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशावरील हल्ला प्रकरण : दीपेश पराते यांना जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 20:34 IST

पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : अटींचे करावे लागेल पालन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पाचवे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश किरण देशपांडे यांना मारहाण करणारे सहायक सरकारी वकील अ‍ॅड. दीपेश मदनलाल पराते यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी हा निर्णय दिला.१४ हजार रुपयांचा जामिनदार सादर करावा, साक्षीदारांवर दबाव आणण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, फिर्यादीची भेट घेऊ नये, दोषारोपपत्र दाखल होतपर्यंत दर रविवारी सदर पोलीस ठाण्यात हजेरी लावावी इत्यादी आदेश न्यायालयाने पराते यांना दिले आहेत. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी पूर्ण झाली होती. त्यानंतर न्यायालयाने राखून ठेवलेला निर्णय शुक्रवारी जाहीर करण्यात आला. पराते यांच्याविरुद्धचा भादंविच्या कलम ३५३ (कर्तव्यावरील सरकारी अधिकाऱ्यावर हल्ला करणे) अंतर्गतचा गुन्हाच केवळ अजामीनपात्र आहे. या गुन्ह्यात पाच वर्षे कारावासाची कमाल शिक्षा आहे. न्यायालयात पराते यांच्यातर्फे अ‍ॅड. मंगेश मून व अ‍ॅड. योगेश मंडपे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. जी. एन. दुबे यांनी कामकाज पाहिले.सरकारकडून कारवाई नाहीजिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी या घटनेची राज्य सरकारला माहिती कळविली आहे. परंतु, घटनेला दोन दिवस लोटूनही सरकारने पराते यांच्याविरुद्ध काहीच कारवाई केली नाही. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळी तेलगोटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सरकारकडून अद्याप काहीच निर्देश प्राप्त झाले नाही असे सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मात्र या घटनेची तत्काळ दखल घेऊन पराते यांच्याविरुद्ध फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतली. तसेच, पराते यांना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्याचा आदेश दिला.

 

टॅग्स :advocateवकिलDistrict Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालय