नाशिकराव तिरपुडे यांची जयंती उत्साहात

By Admin | Updated: January 17, 2016 03:03 IST2016-01-17T03:03:05+5:302016-01-17T03:03:05+5:30

महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री व युगांतर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे ...

Jubilee celebrations of Nashikrao Tirupade | नाशिकराव तिरपुडे यांची जयंती उत्साहात

नाशिकराव तिरपुडे यांची जयंती उत्साहात


नागपूर : महाराष्ट्र राज्याचे प्रथम उपमुख्यमंत्री व युगांतर शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. नाशिकराव उपाख्य बाळासाहेब तिरपुडे यांच्या जयंतीनिमित्त युगांतर शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
युगांतर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजकुमार तिरपुडे, कार्याध्यक्ष वनिता तिरपुडे, कलश तिरपुडे, घना तिरपुडे, महासचिव वामनराव कोंबाडे, उपाध्यक्ष डॉ. टी.व्ही. गेडाम, सचिव गणेश गौरखेडे, बाबा कोंबाडे आदींनी बाळासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले.
संस्थेतर्फे संचालित सर्व शैक्षणिक विभागाचे प्रमुख, शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राचार्य डॉ. के.एस. पाटील, डॉ. विवेक अवसरे, सतीश नायडू यांच्यासह डॉ. ललित खुल्लर, प्रा. सुनील घुलक्षे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्पांजली वाहिली. (प्रतिनिधी)

Web Title: Jubilee celebrations of Nashikrao Tirupade