शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

‘जॉय राईड’चा मार्ग मोकळा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 23:59 IST

अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण करतील.

ठळक मुद्दे ‘सीएमआरएस’ करणार ६ एप्रिलला मेट्रोचे परीक्षण : सिग्नलिंग, ट्रॅक्शन, ट्रॅकची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेक दिवसापासून नागपूर मेट्रोतून ‘जॉय राईड’चा आनंद लुटण्यासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांचा आनंद आता द्विगुणित होणार आहे. येत्या ६ एप्रिलला ‘सीएमआरएस’ (द कमिश्नर आॅफ मेट्रो रेल सेफ्टी) चमूचे तीन अधिकारी दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते मेट्रो प्रकल्पाचे परीक्षण करतील.मेट्रो प्रकल्पाचे सिग्नलिंग आणि टेलिकॉमची तपासणी करून मेट्रोच्या ‘जॉय राईड’चे परीक्षण तसेच सिव्हील, इलेक्ट्रिकल, ट्रॅक्शन, ट्रॅक पाहणी करतील. सीएमआरएसचा हा दौरा अखेरचा असून त्यासाठी नागपूर मेट्रो प्रकल्पाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि इतर सर्व कार्यरत कर्मचारी तयार आहेत. सीएमआरएसची चमू येण्यापूर्वीच प्रकल्पाचे कार्य पूर्ण झाले असून अखेरच्या टप्प्यातील कामांवर लक्ष केंद्रित केले आहे.खापरी मेट्रो स्टेशन ते एअरपोर्ट साऊथपर्यंत मेट्रोची जॉय राईड असल्यामुळे यामार्गादरम्यान मेट्रो ट्रॅक आणि मेट्रो स्टेशनची पाहणी करून स्ीाएमआरएस आपला पाहणी अहवाल आणि अंतिम निर्णय महामेट्रो नागपूरला सादर करणार आहे. यापूर्वी सीएमआरएसने १६ जानेवारीला नागपूर मेट्रोचा दौरा करून प्रकल्पाच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले होते, हे विशेष.मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसला टॅक्सी व आॅटोचालकांचे समर्थनमेट्रो प्रकल्पामुळे ओला, उबेर आणि आॅटोरिक्षाचालकांना भविष्यात प्रवासी सेवेसाठी व्यवसायाच्या जास्त संधी उपलब्ध होणार आहे. मेट्रो स्टेशनच्या पार्किंग परिसरात ओला, उबेर आणि आॅटो रिक्षाचालकांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तेव्हा मेट्रोतून प्रवास करणाºया नागरिकांना त्यांच्या कार्यस्थळी आणि घरपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ओला, उबेर आणि आॅटो रिक्षाचालकांना करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने नागपूर मेट्रोला टॅक्सी आणि आॅटो रिक्षा व शेअरिंग सायकल यांना एका महाकार्डवर जोडण्याचा प्रयत्न महामेट्रो नागपूरतर्फे करण्यात येत आहे. मेट्रोच्या फिडर सर्व्हिसेसला टॅक्सी व आॅटो रिक्षाचालकांचे समर्थन आहे. भविष्यात फिडर सर्व्हिसेसच्या माध्यमाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करून खासगी वाहनांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न महामेट्रो तर्फे केल्या जात आहे. जेणेकरून वायू आणि ध्वनी प्रदूषणाला आळा घालून पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होईल.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर