शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोरिक्षाचा प्रवासच किफायतशीर!

By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST

भाडे नाकारणे, भाडे ज्यादा घेणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणे या आणि अशा अनेक कारणांमुळे नागपुरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचा प्रवास नकोसा होतो.

उपराजधानीतील वाहतूक सुविधा : कुल कॅब खर्चिक मात्र आरामदायी नागपूर : भाडे नाकारणे, भाडे ज्यादा घेणे आणि महत्त्वाची बाब म्हणजे गरज असेल त्या वेळी वाहन उपलब्ध न होणे या आणि अशा अनेक कारणांमुळे नागपुरात धावणाऱ्या आॅटोरिक्षांचा प्रवास नकोसा होतो. परंतु कुल कॅबसारख्या खासगी कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा पाहता आॅटोरिक्षा अजूनही आडमुठ्या भूमिकेतच असल्याचे दिसून येत आहे. कुल कॅब वाहने आरामदायी आणि घरपोच सेवा देत स्पर्धा निर्माण केली असली तरी आर्थिकदृष्ट्या परडवणाऱ्या आॅटोरिक्षा आजही प्रवाशांच्या मनात घर करून आहेत. आर्थिकदृष्ट्या आणि अन्य सोयी-सुविधांबाबतीत या वाहतूक सेवा नागपूरकरांसाठी किती किफायतशीर आहेत याचा ‘लोकमत’ प्रतिनिधीने आढावा घेतला असता, कुल कॅबचा प्रवास थोडा खर्चिक असला तरी, आरामदायी आहे, मात्र आॅटोरिक्षा मीटरने चालल्यास कॅबच्या तुलनेत ती किफायतशीर आहे. ओला कॅबओला कॅब टॅक्सीच्या कॉल सेंटरवर लोकमत प्रतिनिधीने टॅक्सी मागवल्यानंतर ३० मिनिटांत पोहचण्याचे आश्वासन दिले. पहिल्या दोन किलोमीटरसाठी ४९ रुपये तर नंतरच्या प्रति किलोमीटरला १४ रुपये भाडे आकारण्यात येईल, अशी माहिती दिली. यांच्या वातानुकूलित गाड्यातून प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्या तीन किलोमीटरचे भाडे ६३ रुपये पडले. भाडे दिल्यावर त्याची पावती मिळाली. कंपनीकडून टॅक्सीतच बसवलेल्या मोबाईल ट्रॅक आणि जीपीएस यंत्रणेमुळे बिल दिसूनही येते. गाडीच्या चालकाशी संवाद साधल्यावर चालकाने सांगितले, कॅबमधून चांगले उत्पन्न मिळते. ही कॅब चालवण्यापूर्वी कशी यंत्रणा असते, याचे प्रशिक्षण आम्हाला देण्यात आले आहे. यात प्रवाशांशी सौजन्याने कसे वागावे हे समजावून सांगितले जाते. दिलेल्या प्रवासी भाड्याच्या टार्गेटवर कमिशन मिळते, असेही तो म्हणाला.विंग्स कॅब सर्व्हिसेसशहरात कोला कॅब सारखीच विंग्स कॅब सर्व्हिसेस सुरू आहे. मात्र या दोघांच्या भाड्यात तफावत आहे. विंग्स कॅब पहिल्या तीन किलोमीटरसाठी ४८ रुपये तर त्यानंतरच्या प्रति किलोमीटरसाठी १६ रुपये आकारले जाते. यांच्या कॉल सेंटरवर फोन करून गाडी मागितली असता जागेचे लोकेशन घेत २५ मिनिटांच्या आत गाडी उपलब्ध होण्याचे आश्वासन दिले. मात्र गाडी १५ मिनिटांच्या आतच पोहचली. चालकाने फोन करून गाडी आल्याची माहिती दिली. चार किलोमीटरच्या प्रवासाला ६४ रुपये भाडे लागले. भाडे दिल्यावर त्याची पावती मिळाली. चालकाने सांगितले, याआधी खासगी टॅक्सी चालवत होतो. यातून मिळणारे उत्पन्न चांगले आहे. ही कॅब चालवताना आरामही मिळतो, असेही ते म्हणाले. टॅक्सी, आॅटोरिक्षाचा घोळकॅबच्या सुखद प्रवासाच्या तुलनेत टॅक्सी व आॅटोरिक्षाचा प्रवास अडचणीचा गेला. हे दोन्ही वाहन शोधण्यापासून प्रवास सुरू झाला. रेल्वे स्थानकाबाहेर एकच टॅक्सी उभी होती. त्यातही काही तरुण बसलेले होते. चार किलोमीटर अंतरावरील ठिकाण सांगितल्यावर चालकाने १५० रुपये भाडे सांगितले. आॅटोरिक्षाला याबाबत विचारले असता त्याने १२५ रुपये सांगितले. मात्र मीटरने प्रवास करण्यास चालकाने नकार दिला. आॅटोरिक्षाची शोधाशोध सुरू झाल्यावर एक आॅटोरिक्षा मीटरने चलण्यास तयार झाला. चार किलोमीटरला त्याने ५६ रुपये भाडे आकारले. एकाच मार्गावरून प्रवास करताना कुल कॅबपेक्षा आॅटोरिक्षाचे भाडे जरी कमी असले तरी ही टॅक्सी किंवा आॅटोरिक्षा मिळवण्यासाठी होणारी धावपळ, भाड्यामधील घासाघीस, आसनव्यवस्था, अस्वच्छता पाहता कुल कॅब बरी असल्याचे लक्षात येते. मात्र प्रवास भाड्याची तुलना केल्यास आॅटोरिक्षा मीटरने चालत असतील तर ती परवडणारी आहे.