भाकपा नेत्यांना संयुक्त श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:07 IST2021-04-28T04:07:33+5:302021-04-28T04:07:33+5:30

नागपूर : मागील १५ दिवसांमध्ये भाकपाच्या पाच नेतेमंडळींचे निधन झाले. या सर्वांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा शाखा, तसेच डाव्या ...

Joint tribute to CPI leaders | भाकपा नेत्यांना संयुक्त श्रद्धांजली

भाकपा नेत्यांना संयुक्त श्रद्धांजली

नागपूर : मागील १५ दिवसांमध्ये भाकपाच्या पाच नेतेमंडळींचे निधन झाले. या सर्वांना भारतीय कम्युनिस्ट पार्टी जिल्हा शाखा, तसेच डाव्या आघाडीच्या स्थानिक नेत्यांकडून संयुक्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

मागील १५ दिवसांमध्ये नागपुरात भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी जिल्हा सचिव मधुकर मानकर, भारतीय महिला फेडरेशनच्या नेत्या उषा मिश्रा, नागपूर शहरचे माजी शहर सचिव पांडुरंग दुर्गे, कामठी शहर सचिव एजाज अहमद, मोहन नगरचे शाखा सचिव दिनेश साळवे यांचे निधन झाले. या सर्वांना भाकपा जिल्हा समन्वयक युगल रायलु यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रारंभी मौन श्रद्धांजली वाहिल्यानंतर आयटक राज्य महामंत्री श्याम काळे, माकपा नेते नासिर खान, जद (से)चे नेते मुन्ना शेख, फारवर्ड ब्लॉकचे मारोती वानखेडे आदींनी आपल्या संघटनांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली. भाकपा जिल्हा सहसचिव अरुण वनकर यांनी संचालन केले. रवी पराते, श्याम निखारे, बिशनचंद्र निमजे, जयश्री चहादे, देवानंद वर्गणे, ज्योती अडरसहारे आदी उपस्थित होते.

Web Title: Joint tribute to CPI leaders