विक्री व्यवस्थेत सहभागी व्हा!
By Admin | Updated: September 1, 2014 01:06 IST2014-09-01T01:06:49+5:302014-09-01T01:06:49+5:30
बदलत्या वातावरणाचा पिकावर फार मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी तो बदल लक्षात घेऊन, पीक पद्धतीत सुधारणा केली पाहिजे. तसेच विक्री व्यवस्थेतही सक्रिय सहभागी झाले पाहिजे,

विक्री व्यवस्थेत सहभागी व्हा!
‘शेतकरी दिन’ साजरा : विजय घावटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन
नागपूर : बदलत्या वातावरणाचा पिकावर फार मोठा परिणाम होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी तो बदल लक्षात घेऊन, पीक पद्धतीत सुधारणा केली पाहिजे. तसेच विक्री व्यवस्थेतही सक्रिय सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे यांनी केले.
कृषी विभाग, आत्मा यंत्रणा व नागपूर जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. व्हीआयपी रोडवरील वनामती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गोतमारे होत्या. अतिथी म्हणून कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. गोंगे, राज्याचे मुख्य सांख्यिक व नागपूर विभागाचे पालक अधिकारी ए. यू. बनसोडे व पणन मंडळाचे प्रभारी उप सरमहाव्यवस्थापक आर. बी. चलवदे उपस्थित होते.
विशेष म्हणजे, राज्य शासनाने यावर्षीपासून सहकार महर्षि व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त २९ आॅगस्ट हा राज्यभरात ‘शेतकारी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते भिवापूर येथील कृषिभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी डॉ. नारायण लांबट, सावनेर येथील उद्यानपंडित सतीश खुबाळकर, नागोराव टोंगे, बळवंत दडमल व नागपूर जिल्हा फळ व भाजीपाला सहकारी संस्थेचे अध्यक्ष अशोक धावले यांना शाल व श्रीफळ प्रदान करून, त्यांचा गौरव करण्यात आला. संध्या गोतमारे यांनी अध्यक्षीय भाषणातून ‘शेतकरी दिन’ कार्यक्रमाचे कौतुक केले.
तसेच शेतकऱ्यांनी एकत्रित येऊ न सहकारी तत्त्वावर आधुनिक शेती करावी, असेही त्यांनी आवाहन केले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून राष्ट्रीय कृृषी विकास योजनेतर्गंत शेतकरी गटांना भाजीपाला विक्रीसाठी तीन फिरत्या विक्री वाहनांचे वाटपही करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन कृषी उपसंचालक रवींद्र मनोहरे यांनी केले. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुबोध मोहरील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)