‘जीना इसी का नाम है’ ११ आॅक्टोबरला
By Admin | Updated: October 6, 2015 04:16 IST2015-10-06T04:16:13+5:302015-10-06T04:16:13+5:30
लोकमत सखी मंच व इपका लॅबच्या संयुक्त विद्यमाने ‘जीना इसी का नाम है’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे रविवारी ११

‘जीना इसी का नाम है’ ११ आॅक्टोबरला
लोकमत सखी मंच व इपका लॅबचे आयोजन : विविध स्पर्धा व भरपूर बक्षीस
नागपूर : लोकमत सखी मंच व इपका लॅबच्या संयुक्त विद्यमाने ‘जीना इसी का नाम है’ या मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे रविवारी ११ आॅक्टोबर रोजी दुपारी २ ते ६ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. लोकमत सखी मंच वर्षभरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक उपक्रम राबवित असते. जगण्यासाठी ज्याप्रमाणे सृदृढ आरोग्याची गरज आहे, त्याचप्रमाणे मनोरंजनाचीही आवश्यकता आहे. या दृष्टीकोनातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. स्मृती रामटेके या महिलांना भेडसावणाऱ्या हाडांच्या आजाराबद्दल मार्गदर्शन करणार आहे. सखींच्या मनोरंजनासाठी तीन स्पर्धा घेण्यात येणार आहे. ‘येहै-हम दोनो’ यात दोन सखींना एकसमान वेशभूषा करून अभिनय व मिमिक्री करायची आहे. त्याचबरोबर फॅन्सी ड्रेस व डान्स स्पर्धा होणार आहे. प्रत्येक स्पर्धेसाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. डान्स स्पर्धेसाठी सखींना स्वत: सीडी घेऊन यायची आहे. स्पर्धेत सखींचा सहभाग वाढल्यास प्राथमिक राऊंड होऊन पुढच्या राऊंडसाठी निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सखींना खालील दिलेल्या मोबाईल व फोन नंबरवर नोंदणी करता येईल. एसएमएसद्वारेही आपण नोंदणी करू शकता. अधिक माहितीसाठी : नेहा जोशी - २५२९३४५, रोशनी शेगांवकर ९८२३८५४५३५, त्रिवेणी कायंदे ९८८१८१९१६३, अरुणा शेंडे ९३७०७४०२०९ या क्रमांकावर संपर्क करावा. (प्रतिनिधी)