महिलेच्या बॅगेतील दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:12 IST2021-09-07T04:12:20+5:302021-09-07T04:12:20+5:30

माैदा : अज्ञात चाेरट्याने प्रावासी महिलेच्या बॅगेतून साेन्याचे दागिने चाेरून नेले. त्या दागिन्यांची एकूण किंमत २२ हजार रुपये असल्याचे ...

Jewelry snatched from the woman's bag | महिलेच्या बॅगेतील दागिने पळविले

महिलेच्या बॅगेतील दागिने पळविले

माैदा : अज्ञात चाेरट्याने प्रावासी महिलेच्या बॅगेतून साेन्याचे दागिने चाेरून नेले. त्या दागिन्यांची एकूण किंमत २२ हजार रुपये असल्याचे महिलेने पाेलिसांना सांगितले. ही घटना माैदा शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी (दि. ५) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.

विजया मिलिंद मेश्राम (२५, रा. माथनी, ता. माैदा) या भंडारा जाण्यासाठी माैदा बसस्थानकाहून बसमध्ये चढल्या. काही वेळाने त्यांच्या बॅगची चेन उघडी असल्याचे लक्षात येताच त्यांनी आत ठेवलेले दागिने तपासून बघितले. यात चाेरट्याने साेन्याचे २२ हजार रुपये किमतीचे तीन दागिने चाेरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बाब त्यांनी इतर प्रवाशांसाेबतच कंडक्टरला सांगितली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी अज्ञात चाेरट्याविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार इंगलवार करीत आहेत.

Web Title: Jewelry snatched from the woman's bag