राेख रकमेसह दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:10 IST2021-04-30T04:10:08+5:302021-04-30T04:10:08+5:30
खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम, साेन्याचे मंगळसूत्र व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा ...

राेख रकमेसह दागिने लंपास
खापरखेडा : अज्ञात चाेरट्याने घरफाेडी करीत राेख रक्कम, साेन्याचे मंगळसूत्र व माेबाईल हॅण्डसेट असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना खापरखेडा शहरातील जयभाेलेनगर वाॅर्ड क्र. १ येथे रविवारी (दि.२५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मिनीषा मनाेज बाेरकर (३५, रा. वाॅर्ड क्र. ४, खापरखेडा) यांच्या वडिलांचे वाॅर्ड क्र. १ येथे घर असून, त्यांच्या घराच्या समाेरील दाराची कुंडी ताेडून चाेरट्याने आत प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील आलमारीतून सहा ग्रॅम साेन्याचे जुने मंगळसूत्र किंमत सहा हजार रुपये, राेख पाच हजार रुपये व तीन हजाराचा माेबाईल हॅण्डसेट असा एकूण १४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. साेमवारी (दि.२६) सकाळी १०.३० वाजता ही बाब मिनीषाच्या लक्षात येताच तिने पाेलिसात तक्रार नाेंदविली. याप्रकरणी खापरखेडा पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, पुढील तपास पाेलीस हवालदार उमेश ठाकरे करीत आहेत.