राेख रकमेसह दागिने लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:10 IST2021-02-16T04:10:08+5:302021-02-16T04:10:08+5:30

बुटीबाेरी : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून ...

Jewelry lamps with cash | राेख रकमेसह दागिने लंपास

राेख रकमेसह दागिने लंपास

बुटीबाेरी : अज्ञात आराेपीने घरफाेडी करीत राेख रक्कम व साेन्याचे दागिने असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुटीबाेरी शहरातील काचाेरे ले-आऊट येथे रविवारी (दि.१४) सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

वसंता ओमकार आदवारे (३६, रा. काचाेरे ले-आऊट, बुटीबाेरी, हल्ली मु. अजनी, नागपूर) यांचे आईवडील ८ फेब्रुवारीला नागपूर येथे मुक्कामी गेले हाेते. दरम्यान, अज्ञात आराेपीने त्यांच्या बंद घराच्या दाराचे कुलूप वाकवून आत प्रवेश केला. यात आराेपीने घरातील बेडरूममधील लाेखंडी कपाटाच्या लाॅकरमध्ये ठेवलेले २६ हजार रुपये किमतीचे वापरातील जुने साेन्याचे दागिने व राेख १०,००० रुपये असा एकूण ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच वसंता आदवारे यांनी पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरखेडे करीत आहेत.

Web Title: Jewelry lamps with cash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.