शहरं
Join us  
Trending Stories
1
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
2
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
3
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
4
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
5
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
6
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
7
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
8
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
9
आजचा अग्रलेख: विधानसभेसाठी ‘स्मार्ट’ खेळी
10
पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!
11
अण्णासाहेब पाटील महामंडळातील ६१ कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
12
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
13
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
14
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
15
शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
16
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
17
दफन केलेले मुलाचे प्रेतच गायब; दिसला फक्त खड्डा!
18
रवींद्र वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण
19
स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?
20
ताजा विषय: शिक्षकांना मोठा पगार मिळाला तर पोटात का दुखते?

जेट एअरवेजचे नागपूर-दिल्ली-नागपूर उड्डाण रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:04 AM

जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला.

ठळक मुद्देसंपूर्ण मार्च महिन्यात बंद राहणार तीन उड्डाणे

लोकमत  न्यूज नेटवर्क नागपूर : जेट एअरवेजचे बुधवारी नागपूर-दिल्ली-नागपूर विमान रद्द करण्यात आले. गुरुवारी या मार्गावर कंपनीची विमाने उड्डाण भरणार नाहीत. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा त्रास सहन करावा लागला.नागपूर येथील एका प्रवाशाला दिल्लीत अनेक तास थांबावे लागले. त्यांनी सांगितले की, कंपनीने विमान गुरुवारी रद्द केल्यामुळे विमानतळावर विचारपूस करण्यास आलेल्या अनेकांना निराश होऊन परतावे लागले. ऑपरेशन कारणांनी उड्डाण रद्द करण्यात आल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. याच कारणांमुळे संपूर्ण मार्च महिन्यात उड्डाणे बंद राहणार आहे. यामध्ये सकाळ आणि दुपारच्या दिल्ली विमानाव्यतिरिक्त रात्री ९.२० वाजता उड्डाण भरणारे ९डब्ल्यू २८६५ मुंबई-नागपूर विमान रद्द राहील.कंपनीच्या सूत्रांनी सांगितले की, विमानात लोड फॅक्टरचे कारण नाही. पण परीक्षा आणि वित्तीय वर्षाचा अखेरचा महिना असल्यामुळे प्रवाशांच्या संख्येवर आंशिक परिणाम होते. पण व्यावसायिक आणि अन्य प्रवाशांच्या ये-जा यावर काहीही परिणाम होत नाही. सध्या कंपनी संकटात आहे. मार्चमध्ये बंद राहणारी विमानसेवा भविष्यात सुरू होईल.पाच विमानांना विलंबदेशाच्या विभिन्न शहरातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या पाच विमानांना बुधवारी ३० मिनिटे ते ३.४५ तासांपर्यंत उशीर झाला. ६ई५०९ बेंगळुरू-नागपूर विमान १.१२ तास उशिरा अर्थात सकाळी ७.४५ ऐवजी ८.५७ वाजता पोहोचले. ६ई ३८२ इंदूर-नागपूर जवळपास ३.४५ तास उशिरा अर्थात सायंकाळी ६.३० ऐवजी रात्री ९.१५ वाजता आले. पुणे-नागपूर विमान ४० मिनिटे उशिरा ८ वाजता पोहोचले. याशिवाय नागपुरातून अन्य शहरात जाणाऱ्या ६ई३१४ नागपूर-चेन्नई विमानाने १.४७ मिनिटे उशिरा अर्थात ५.३७ वाजता उड्डाण भरले. तर ६ई२०२ नागपूर-दिल्ली ४० मिनिटे उशिरा अर्थात सायंकाळी ७.५० ऐवजी रात्री ८.३० वाजता रवाना झाले.

टॅग्स :Jet Airwaysजेट एअरवेजDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर