‘जेईई’ला ‘ऑनलाईन’ माध्यमातून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:09 IST2021-02-24T04:09:34+5:302021-02-24T04:09:34+5:30

नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘जेईई-मेन्स’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ...

‘JEE’ started through ‘online’ | ‘जेईई’ला ‘ऑनलाईन’ माध्यमातून सुरुवात

‘जेईई’ला ‘ऑनलाईन’ माध्यमातून सुरुवात

नागपूर : ‘आयआयटी’सह देशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या ‘जेईई-मेन्स’ला मंगळवारपासून सुरुवात झाली. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ‘ऑनलाईन’ माध्यमातून परीक्षा घेण्यात येत आहे. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना फारशा अडचणी आल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शहरात बेलतरोडी तसेच हिंगणा परिसरातील परीक्षा केंद्रांवर ही ‘ऑनलाईन’ परीक्षा सुरू झाली. ‘कोरोना’चे आकडे वाढत असल्याने केंद्रांवरील गर्दी टाळणे महत्त्वाचे आव्हान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोहोचण्याच्या वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या. सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या कालावधीत ‘बीआर्क’ व ‘बी प्लॅनिंग’साठी परीक्षा झाली. यंदा विद्यार्थ्यांना ‘सॅनिटायझर’ नेण्याचीदेखील परवानगी देण्यात आली आहे.

नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार प्रयत्नांपैकी ही पहिली परीक्षा आहे. यंदा २३ ते २६ फेब्रुवारी, १५ ते १८ मार्च, २७ ते ३० एप्रिल आणि २४ ते २८ मे या काळात परीक्षा देण्याच्या चार संधी मिळणार आहेत.

Web Title: ‘JEE’ started through ‘online’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.