‘जेईई-मेन्स’चा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:10 IST2021-03-09T04:10:11+5:302021-03-09T04:10:11+5:30

नागपूर : देशातील आयआयटी, एनआयटी तसेच अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ या परीक्षेचा निकाल सोमवारी ...

‘JEE-Mains’ results announced | ‘जेईई-मेन्स’चा निकाल जाहीर

‘जेईई-मेन्स’चा निकाल जाहीर

नागपूर : देशातील आयआयटी, एनआयटी तसेच अग्रमानांकित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या ‘जेईई-मेन्स’ या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील एकाही विद्यार्थ्याचा एनटीए स्कोअर १०० इतका नसून पहिल्या ५० मध्ये एकाचाही समावेश नाही. नव्या नियमांनुसार विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या चार प्रयत्नांपैकी ही पहिली परीक्षा होती. आता आणखी तीन प्रयत्न विद्यार्थी देऊ शकतात. यानंतर १५ ते १८ मार्च, २७ ते ३० एप्रिल आणि २४ ते २८ मे या काळात परीक्षा देण्याच्या चार संधी मिळणार आहेत.

‘एनटीए’तर्फे २४ ते २६ फेब्रुवारीदरम्यान परीक्षा घेण्यात आली होती. ‘कोरोना’चा प्रकोप अद्यापही कायम असल्याने ऑनलाइन माध्यमातून ही परीक्षा झाली. नागपूर तसेच विदर्भातील विविध महाविद्यालयांतून पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपुरातून ‘जेईई-मेन्स’ दिली. त्यातील कोणता विद्यार्थी टॉपर आला हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नव्हते. महाविद्यालये व कोचिंग क्लासेसतर्फे निकालांचे विश्लेषण सुरू होते. विद्यार्थ्यांचा अर्ज क्रमांक टाकणे अनिवार्य होते. त्यामुळे महाविद्यालये व कोचिंग क्लासेच्या हाती सर्व विद्यार्थ्यांचा नेमका व अचूक निकाल उशिरापर्यंत येऊ शकला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: ‘JEE-Mains’ results announced