एलेक्सिस हॉस्पिटलला जेसीआय गोल्ड सील मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 21:55 IST2019-09-03T20:22:08+5:302019-09-03T21:55:28+5:30
एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे.

एलेक्सिस हॉस्पिटलला जेसीआय गोल्ड सील मान्यता
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे. अद्ययावत उपचार प्रणाली, दर्जेदार आरोग्य सेवा व रुग्णांसाठी असलेल्या वचनबद्धतेसाठी ही मान्यता सर्वात मोठे ‘हेल्थकेअर अक्रेडिटर’ असलेल्या ‘जेसीआय’ने नागपूरच्या एलेक्सिस हॉस्पिटलला दिली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक ताहेर शम्स यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.
यावेळी एलेक्सिस हॉस्पिटलचे सीईओ सूरज त्रिपाठी उपस्थित होते. ताहेर शम्स म्हणाले, आंतरराष्ट्रीयआरोग्य सेवा अधिकृततेसाठी ‘जेसीआय’ गुणवत्ता आणि सुरक्षा यांच्या सुधारेणसाठी काम करते. यामुळे हॉस्पिटलला मिळालेला हा सन्मान मोठा आहे. गुणवत्तापूर्ण रुग्णसेवेचे हे एकप्रकारे प्रमाणपत्रच आहे. या मान्यतेमुळे वैद्यकीय सेवेतील गुणवत्तेची एक पायरी आम्ही गाठली आहे. एलेक्सिस दर्जेदार आरोग्य सेवेसाठी निरंतर प्रयत्नशील राहील. ‘एनएबीएच’ आणि ‘एनएबीएल’नंतर ‘जेसीआय’कडूनही मिळालेल्या मान्यतेचा आम्हाला अभिमान आहे. ‘जेसीआय’ ही २० हजाराहून जास्त संस्थांचे मूल्यांकन करते. यामुळे कोणत्याही रुग्णालयासाठी जेसीआय असणे महत्त्वाचे ठरते. ही मान्यता ११९८ क्लिनिकल पॅरामीटरचे पालन केल्यावरच मिळते. एलेक्सिस हॉस्पिटल नागपूर, हे जगातील नवीनतम रुग्णालयांपैकी एक आहे आणि स्थापनेपासून ३२ महिन्यांच्या कालावधीत ही मान्यता प्राप्त झाली आहे.
सूरज त्रिपाठी म्हणाले, ‘जेसीआय’चा मान एलेक्सिस हॉस्पिटलपुरताच मर्यादित नसून संपूर्ण नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. जगभरात १०९० रुग्णालये आहेत आणि त्यापैकी भारतातील ३९ रुग्णालयांनाच हा सन्मान प्राप्त झाला आहे. हे केवळ आमच्या रुग्णांंमुळेच शक्य झाले आहे. मध्य भारतातील गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा आणि रुग्ण सुरक्षा पुरविणारे सर्वाेत्तम रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या ‘एलेक्सिस’च्या शिरपेचात आणखी एक मानेचा तुरा रोवला गेला आहे. रुग्णांच्या काळजीत आंतरराष्ट्रीय मानके जपण्यासाठी आम्ही निरंतर प्रयत्न करीत असतो. या मान्यतेमुळे भारतात आरोग्य सेवेचा मानदंड उंचावेल, असेही ते म्हणाले.