नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 20:28 IST2020-02-25T20:26:34+5:302020-02-25T20:28:12+5:30
कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली.

नागपुरातील कुख्यात गुंड संतोष आंबेकरच्या आलिशान बंगल्यावर जेसीबी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर याने नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोड येथे तीन प्लॉट एकत्र करून ८ हजार ४६० चौरस फुट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली. मंगळवारी पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने या कारवाईला सुरुवात झाली.
आंबेकर याने नेहा संतोष आंबेकर यांचा ६०.१८ चौरस मीटर, अमरचंद मगनलाल मेहता यांचा ७२१.५६ चौरस मीटर व संतोष आंबेकर याच्या स्वत:च्या नावावर असलेला २१.३० चौरस मीटर असे तीन प्लॉट एकत्र करून ८०३ चौरस मीटर जागेवर (८६४०.२८ चौ.फूट) महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता अलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केले होते.
महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी १२ च्या सुमारास कारवाईला सुरूवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला. तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे. यावेळी मनपाच्या प्रवर्तन विभागाचे सहायक आयुकत अशोक पाटील, लकडगंज झोनच पोलीस निरीक्षक नरेंद्र हिवरे यांच्यासह महापालिका व पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.