जटामखाेरा ग्रामपंचायतीचे बिनविराेधचे रेकाॅर्ड कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:22 IST2021-01-08T04:22:50+5:302021-01-08T04:22:50+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क सावनेर : जटामखाेरा (ता. सावनेर) येथील मतदारांनी बिनविराेध निवडणुकीची परंपरा याही निवडणुकीत कायम ठेवली आहे. एकूण ...

जटामखाेरा ग्रामपंचायतीचे बिनविराेधचे रेकाॅर्ड कायम
लाेकमत न्यूज नेटवर्क
सावनेर : जटामखाेरा (ता. सावनेर) येथील मतदारांनी बिनविराेध निवडणुकीची परंपरा याही निवडणुकीत कायम ठेवली आहे. एकूण सात सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत यावेळी १० उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले हाेते. मात्र, यातील तिघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने उर्वरित सात उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविराेध निवड झाली आहे.
जटामखाेरा हे आदिवासी बहुल गाव आहे. या ग्रामपंचायतची एकूण सदस्य संख्या सात असून, येथील आदिवासी बांधवांना त्यांच्या आर्थिक घरकर व पाणीकराचा भरणा करणे शक्य हाेत नाही. त्यामुळे निवडणूक लढायची म्हटली तर कराचा भरणा आधी करावा लागताे. परिणामी, निवडणुकीला उभे करावयाच्या उमेदवारांच्या कराचा भरणा करण्यापासून इतर सर्व खर्च हा पॅनेल प्रमुखालाच करावा लागताे. हा खर्च त्यांनाही झेपणारा नसताे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने येथील बहुतांश नागरिक निवडणूक लढण्यास फारसे उत्सूक नसतात. त्यामुळे येथील ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविराेध करण्याची परंपरा सुरू झाली.
साेनू रावसाहेब यांनी मागील काही वर्षांत या गावाचा बऱ्यापैकी विकास घडवून आणला. गावातील विकास कार्य यापुढेही सुरू ठेवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे यावेळची निवडणूक बिनविराेध व्हावी, असा प्रस्ताव त्यांनी स्थानिक मतदारांसमाेर ठेवला. मात्र, सुरुवातीला सात जागांसाठी १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले हाेते. त्यामुळे तीन जागांसाठी निवडणूक हाेणार असल्याची चिन्हे दिसून लागली. त्यातच साेनू रावसाहेब यांच्या विनंतीवरून त्या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे सातही उमेदवारांची बिनविराेध निवड झाली आहे. यात वाॅर्ड क्रमांक १ मधील सोनू रावसाहेब व मंगला उईके, वाॅर्ड क्रमांक-२ मधील अंकुश आत्राम, सत्यफुला उईके, ममता ढोबळे, वाॅर्ड क्रमांक-३ मधील विकास मरसकोल्हे व रिना रावसाहेब यांचा समावेश आहे.