जरीपटका हॉकर्स झोनमधील अतिक्रमण हटवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:29+5:302021-09-23T04:09:29+5:30
नागपूर : जरीपटका हॉकर्स झोनमधील सर्व दुकानांचे अतिक्रमण हटवून हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. या परिसरात पुन्हा ...

जरीपटका हॉकर्स झोनमधील अतिक्रमण हटवले
नागपूर : जरीपटका हॉकर्स झोनमधील सर्व दुकानांचे अतिक्रमण हटवून हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. या परिसरात पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता ताराचे कुंपण घातले जाणार आहे, तसेच अतिक्रमणावर लक्ष ठेवण्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती दिली.
यासंदर्भात नितीन लालवानी व इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या तारखेला न्यायालयाने या परिसरातील अतिक्रमण हटवून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, मनपाने कारवाई करून ही माहिती दिली. त्यानंतर न्यायालयाने मनपाला यावर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगून प्रकरणावर गुरुवारी पुढील सुनावणी ठेवली. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. श्याम देवानी तर, मनपातर्फे ॲड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.