शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
2
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
3
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
4
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
5
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
6
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका
7
राम मंदिराच्या पहिल्या मजल्याचे काम वेगाने सुरु; ‘असा’ असेल राम दरबार, कधी होणार पूर्ण?
8
नफ़रत नहीं, नौकरी चुनो! 'इंडिया'चे सरकार बनतंय; ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणार : राहुल गांधी
9
"आमचे अणुबॉम्ब कायम सज्ज असतात"; रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची अमेरिकेला खुली धमकी
10
‘पैसे मिळाले नाहीत का तुला? मिळाले नसतील तर...’, भरसभेत अजित पवार यांनी विचारलं आणि...
11
“उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन बिघडले, मानसोपचार तज्ज्ञांची गरज”: देवेंद्र फडणवीस
12
Lok Sabha Elections 2024 : भावासाठी भाऊ मैदानात! युसूफ पठाणच्या विजयासाठी इरफानने कसली कंबर!
13
शेअर बाजार कोसळला; सेन्सेक्स 1000 तर निफ्टी 350 अंकांनी घसरले, 7 लाख कोटी बुडाले
14
भाजपा नेते सूरज पाल अम्मू यांचा राजीनामा, पत्राद्वारे सांगितलं कारण....
15
दिवसभर केलं शूट, इंटिमेट सीननंतर झाल्या वेदना; 'हीरामंडी' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
16
'प्रत्येक गोष्टीला कारण असतं', हास्यजत्रा सोडल्यानंतर गौरव मोरेने चाहत्यांच्या प्रश्नांना दिलं उत्तर
17
"डबल इंजिन सरकारने शेतकरी, मजुरांना डबल झटका दिला; भाजपा संविधानाशी खेळतेय"
18
“बोरिवलीपासून कोकण रेल्वेला जोडणारी वाहतूकसेवा लवकरच सुरु करणार”: पीयूष गोयल 
19
जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले
20
"हो, कपिल शर्मा शोची कॉपी केली", 'चला हवा येऊ द्या'बाबत निलेश साबळेचं स्पष्ट वक्तव्य

जरा हटके : नागपुरात घराच्या गेटवर लागल्यात लाल पाण्याच्या बाटल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2019 10:45 PM

शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही.

ठळक मुद्देकुत्र्यांच्या त्रासापासून सुटका मिळविण्यासाठी अनोखा उपाय : तज्ज्ञ म्हणतात ही अंधश्रद्धा

मंगेश व्यवहारे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील अनेक वस्त्यांमध्ये बहुतांश घराच्या गेटपुढे लाल रंगाचे पाणी बाटलीत भरून लटकविल्याचे चित्र आहे. यामागचे कारण विचारले असता, हशा पिकल्याशिवाय राहणार नाही. ज्यांनी आपल्या घराच्या गेटपुढे या बाटल्या लटकविल्या आहे, ते म्हणतात कुत्रे यामुळे घराच्या दारापुढे शौच करीत नाही. वस्त्यांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून ही अफवा वेगाने पसरली आहे. अनेकांच्या घराच्या गेटपुढे लाल पाण्याच्या बाटला लटकविलेल्या दिसत आहे.लाल रंगाचे पाणी तयार करून ते बाटलीमध्ये भरून गेटच्या समोर ती बाटली लटकविली आहे. एका एका घरापुढे दोन दोन बाटल्या आहे. हा प्रकार स्लम वस्त्यांमध्येच नाही, तर सुशिक्षितांच्या वस्त्यांमध्ये सुद्धा बघायला मिळतो आहे. वस्त्यांमध्ये फिरणारे मोकाट कुत्रे घरापुढे शौच करतात. अनेकजण या त्रासामुळे कंटाळले आहे. मात्र त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी हा पर्याय निवडला आहे. नेमकी ही शक्कल कुणी लढविली आणि ती शहरभर कशी काय पसरली यासंदर्भात काही रहिवाशांशी चर्चा केली. परंतु कुणालाच यामागचे खरे कारण माहीत नाही. लोकांनी सांगितले की, कुत्रे लाल पाणी पाहून शौच करीत नाही. वस्तीमध्ये एकमेकांनी लावलेले पाहून आम्ही सुद्धा लावले. चंद्रमणीनगर मधील राजू वाघमारे म्हणाले की, बाटल्या लावल्यानंतर कुत्र्यांनी शौच केलेली आढळली नाही. यामागचे तथ्य जाणून घेण्यासाठी शहरातील श्वान तज्ञ डॉ. हेमंत जैन यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, कुत्रे हे कलर ब्लार्इंड असतात. त्यांना डोळ्यांनी कलर ओळखता येत नाही. जसा माणसांच्या डोळ्यात दोन कोन असल्यामुळे माणसांना रंग ओळखता येतो. मात्र कुत्र्यांच्या डोळ्यात कोनची संख्या माणसाच्या तुलनेत फार कमी असते. कुत्रा फक्त पिवळा व निळा रंग काही प्रमाणात ओळखतो. घरासमोर लाल रंगाचे पाणी भरलेली बॉटल ही निव्वळ अंधश्रद्धा आहे. कुत्रे घरासमोर शौच किंवा लघवी करणे म्हणजे ते प्रथम वास घेतात योग्य जागा शोधतात व नंतरच करतात. कुत्री जेव्हा हीट पिरेडवर असते, तेव्हा तिचा वास इतर कुत्र्यांना अर्धा किलोमीटरपर्यंत जातो व इतर कुत्रे तिच्यामागे लागतात. त्यामुळे कुत्रे घरासमोर येऊन लघवी करतात. त्याला ‘सेंट मार्किंग’ असे म्हणतात.डॉक्टरांच्या मते ही अंधश्रद्धा असली तरी, शहरात ती झपाट्याने पसरत आहे, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यामुळे कुत्रे घरासमोर शौच करीत नाहीव्हिनेगर, मीरे पुड, तिखट घरासमोर टाकल्यामुळे कुत्रे तिथे भटकत नाही व घरासमोर शौच किंवा लघवी करीत नाही. त्या वासामुळे कुत्रे दूर पळतात.डॉ. हेमंत जैन, प्रसिद्ध श्वान तज्ञ

 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेnagpurनागपूर