शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Jara hatke : दृष्टीहीन मुलगी बनली 'ह्युमन कॅलेंडर '

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 00:05 IST

नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते.

ठळक मुद्देमेंदूचे अनन्यसाधारण कार्य एक ‘सिंड्रोम’ : चंद्रशेखर मेश्राम यांची माहिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नऊ वर्षांची जन्मजात अंध असलेली आस्था ही जुन्या वर्षांचेच नव्हे तर येणाऱ्या वर्षांमध्ये कोणत्या तारखेला कोणता दिवस येतो, हे अचूकपणे सांगते. म्हणूच तिला ‘ह्युमन कॅलेंडर’ म्हणजे मानवी दिनदर्शिका असेही संबोधिले जाते. आस्थाला जगातील सर्व देशाच्या राजधान्यांची नावे तोंडपाठ आहेत. एवढेच नाहीतर मोठमोठे गणितही काही मिनिटातच ती सोडविते. हे आश्चर्यकारक असले तरी, हा एक ‘सिंड्रोम’ आहे, अशी माहिती जागतिक ट्रॉपीकल न्यूरोलॉजिचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी दिली.डॉ. मेश्राम म्हणाले, अनन्य साधारण मेंदूच्या या क्षमतेला वैद्यकीय भाषेत ‘सावंत सिंड्रोम’ म्हटले जाते. याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे ‘किम पीक’. ‘रेन मॅन’ हा चित्रपट त्यांच्यावर आधारित आहे. जगात या ‘सिंड्रोम’चे मोजकेच लोक आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याचे प्रमाण मोठे आहे. ‘सावंत सिंड्रोम’ हा जन्मापासून असू शकतो, किंवा मेंदूच्या आजारामुळे किंवा मेंदूला मार लागल्यामुळेही होऊ शकतो. संगीत, गणित, स्मरणशक्ती आणि चित्रकलेत अशा व्यक्तींमध्ये याची विशेष अभिरुची असते. यातील ५० टक्के लोकांना ‘ऑटिझम’सुद्धा असतो, असेही ते म्हणाले. आज साधणार संवाद‘नॅशनल ब्रेन विक’च्या निमित्ताने डॉ. चंद्रशेखर मेश्राम अशा अनेक ‘सिंड्रोम’वर रविवार २२ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कवी कुलगुरू कालिदास सभागृह, गायत्री नगर आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टीम लिमिटेड येथे मार्गदर्शन करतील. सोबतच डॉ. श्याम बाभुळकर हे रस्ते अपघातात ‘हेड इन्जुरी’, डॉ. लोकेंद्र सिंग हे ‘मेंदूचे आरोग्य कसे राखावे’ व डॉ. सुधीर भावे हे ‘इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि ब्रेन’ या विषयावर मार्गदर्शन करतील.‘जर समजून घ्या’ नाटकयाच सभागृहामध्ये ज्येष्ठ अभिनेते व मानसिक रोग तज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांची प्रमुख भूमिका असलेले नाटक ‘जर समजून घ्या’ सादर केले जाईल. मराठी अभिनेत्री मंजुषा घोळसे यांचाही सहभाग असणार आहे. नाटकानंतर डॉ. आगाशे श्रोत्यांशी संवाद साधतील. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन डॉ. मेश्राम यांच्या पुढाकारात नागपूर न्यूरो सोसायटी, ऑरेंज सिटी क्लचरल फाऊंडेशन, नागपूर महानगरपालिका, नागपूर सायकॅट्रीक सोसायटी नागपूर, सप्तक डॉ. आंबेडकर कॉलेज स्पोर्ट्स अकादमी आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्यावतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेnagpurनागपूर