अलाहाबाद बँकेत जनधन योजना
By Admin | Updated: August 29, 2014 01:00 IST2014-08-29T01:00:05+5:302014-08-29T01:00:05+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुन्या अलाहाबाद बँकेने केंद्र सरकारची पंतप्रधान जनधन योजना एका भव्य कार्यक्रमात व ५०० नवीन ग्राहकांच्या उपस्थितीत दाखल केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून

अलाहाबाद बँकेत जनधन योजना
नवीन खातेदारांना आर्थिक लाभ मिळणार : ओव्हरड्राफ्टची सोय
नागपूर : सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात जुन्या अलाहाबाद बँकेने केंद्र सरकारची पंतप्रधान जनधन योजना एका भव्य कार्यक्रमात व ५०० नवीन ग्राहकांच्या उपस्थितीत दाखल केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाचे मुख्य महाव्यवस्थापक पी.के. जेना, उपमहाव्यवस्थापक आर.आर. बागडे, बँकेचे फिल्ड महाव्यवस्थापक (पश्चिम मुंबई) संजय अग्रवाल आणि नागपूर मंडळाचे प्रमुख के. मुरलीकृष्ण प्रामुख्याने उपस्थित होते.
बँकिंग मित्रच्या माध्यमातून ग्रामीण भागात बँकिंग व्यवसाय वाढविण्यात येत आहे. नवीन खातेदारांना विशेषत: महिलांना बचतीचे आवाहन यावेळी करण्यात आले. या योजनेत १ लाख रुपयांचा विमा तसेच सहा महिन्यानंतर ५ हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट मिळेल. महाराष्ट्रात २९ हजार खाते नव्याने सुरू झाल्याची माहिती पाहुण्यांनी दिली. (वाणिज्य प्रतिनिधी)