नागपुरात भाजपाकडून विजयाचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:10 AM2019-05-25T00:10:03+5:302019-05-25T00:10:49+5:30

लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले.

Jallosh about BJP's victory in Nagpur | नागपुरात भाजपाकडून विजयाचा जल्लोष

नागपुरात भाजपाकडून विजयाचा जल्लोष

Next
ठळक मुद्देशहरात विविध ठिकाणी आनंदोत्सव : आतषबाजी, मिठाईवाटप करुन जनतेचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये देशात व नागपुरात भाजपाला विजय मिळाल्यानंतर पक्षामध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. भाजपाकडून शुक्रवारी शहरातील विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला. कुठे आतषबाजी करण्यात आली तर कुठे जनतेमध्ये मिठाई वाटून मतदारांचे आभार मानण्यात आले.
लक्ष्मीनगर येथे भाजपातर्फे सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी दक्षिण पश्चिम नागपुरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आ.सुधाकर देशमुख, आ.सुधाकर कोहळे, आ.कृष्णा खोपडे इत्यादी नेत्यांच्या घराजवळदेखील आनंदोत्सव साजरा करण्यात आला व ढोलताशांच्या गजरात रॅली काढण्यात आल्या.
जपानी गार्डनमध्येदेखील जल्लोष करण्यात आला. यावेळी लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मुखवटा लावून एकमेकांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मिठाई, नाश्ता इत्यादींचे वाटप करण्यात आले. सेंट्रल क्लबतर्फे हे आयोजन झाले. यावेळी अध्यक्ष किशोर ठुठेजा, जपानी गार्डन अध्यक्ष सुरेंद्र गुप्ता, प्रभात, अधिवक्ता नलिन मजिठिया, जगदीश खत्री, महेश केवलरामानी, हैरी मूलचंदानी, प्रकाश खेमचंदानी, स्वामीजी, राजा सहस्रबुद्धे, राजू जैन, नरुल हक, पप्पू सोनी, सरदार नरेंद्र सिंह, खुशाल, कमलेश, कविता वोरा, विजयश्री खानोरकर, मुकेश माखीजानी, शंकर काछेला, चौधरी, राजेंद्र बंसल, अनिल दासवानी, अजय राजपूत, रेखा ठाकुर, संजय खिलवानी, राकेश गिडवानी, प्रियम केजरीवाल इत्यादी उपस्थित होते.

 

Web Title: Jallosh about BJP's victory in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.