शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

जैश ए मोहम्मदचे संघ मुख्यालय टार्गेट; काश्मीरमध्ये पकडलेल्या स्लीपरकडून खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 21:29 IST

Nagpur News जैशने संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देपाच महिन्यांपूर्वी झाली रेकी

नागपूर : नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट सहा महिन्यांपासून पाकिस्तानात शिजत असून दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने आपल्या स्लिपर मार्फत नागपुरातील संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बॅसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तो हल्ला उधळून लावला होता. त्यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नानही घातले होते. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय, नागपूर रेल्वेस्थानक, दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त अनेकदा पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात केंद्रीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. येथे २४ तास सीआयएसएफचे सशस्त्र जवान तैनात असतात.

संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षात कसल्याही प्रकारची अनुचित घटना अथवा इशारा मिळाला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी श्रीनगर (काश्मीर)मध्ये तेथील सुरक्षा दलाने जैश ए मोहम्मदच्या एका स्लीपरला अटक केली. त्याच्या चौकशीतून, सप्टेंबर २०२१ मध्ये तो नागपुरात आला होता आणि त्याने संघ मुख्यालय, रेशिमबागचे स्मृती मंदिर तसेच परिसरातील व्हिडीओ आणि छायाचित्र काढल्याचे कबूल केले. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालय तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी नागपूर पोलिसांना दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे सोपविला आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेचे एक पथक काश्मिरमध्ये जाऊन आले असून त्यांनी स्लिपरकडून करण्यात आलेल्या रेकीसंबंधीची सविस्तर माहिती घेतली आहे. आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी संघ मुख्यालय, रेशिमबाग परिसरात जाऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आजुबाजुच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमला.

कोतवालीत गुन्हा दाखल

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना जैशच्या दहशतवाद्यांनी नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी केली असून आम्ही त्यासंबंधाने कोतवाली ठाण्यात अन लॉ फुल ॲक्टिव्हिटिज ॲक्टनुसार गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे यासंबंधाने सविस्तर बोलता येणार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले.

शहर पोलीस अलर्ट मोडवर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून बंदी घातली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१,३) प्रमाणे हे प्रतिबंध करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

 

टॅग्स :RSS Headquartersराष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय