जैन धर्मातील तपस्वींचा होणार सन्मान

By Admin | Updated: October 7, 2015 03:35 IST2015-10-07T03:31:54+5:302015-10-07T03:35:19+5:30

सकल जैन समाजाच्यावतीने क्षमायाचना आणि तपस्वींच्या सन्मान महोत्सवाचे आयोजन बुधवार ७ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे.

Jains will be honored by the saints | जैन धर्मातील तपस्वींचा होणार सन्मान

जैन धर्मातील तपस्वींचा होणार सन्मान

नागपूर : सकल जैन समाजाच्यावतीने क्षमायाचना आणि तपस्वींच्या सन्मान महोत्सवाचे आयोजन बुधवार ७ आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हा महोत्सव गांधीसागर जवळील रजवाडा पॅलेस येथे होईल. या कार्यक्रमात आठ आणि त्यापेक्षा अधिक तपस्या करणाऱ्या तपस्वींचा सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार विजय दर्डा राहतील.
सकल जैन समाजाचे गणमान्य नरेश पाटनी, संतोष पेढारी, गणेश काका जैन, नवलचंद पुगलिया, मनीष मेहता, जैनेन्द्र लाला, प्रभात धाडीवाल, पंकज भन्साली, रतनचंद गंगवाल, डॉ. भागचंद जैन, राजेन्द्र पटोरिया, प्रफुल्ल दोशी निहालचंद जैन, कांतीलाल झामड, राजेन्द्र लोढा, अभयकुमार पनवेलकर, चंद्रकांत वेखंडे, प्रकाश मारवाडकर, मगनभाई दोशी, अनिल जैन (विद्यासागर), रमेश मिल्टन, डॉ. संतोष मोदी, राजेन्द्र प्रसाद बैस, रमेश शहा, दिनेश बेताला, अनिल पारख, दिलिप रांका, आसाराम नाहटा, बिरदीचंद चोरडिया, विजय सुराना, संजय पुगलिया, डॉ. रिचा जैन, डॉ. मंजू जैन, अतुल कोटेचा आणि सकल जैन समाजाचे महामंत्री निखिल कुसुमगर यांनी सर्व भविकांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमात सर्व जैन संस्थांचे पदाधिकारी संबंधितांना क्षमा याचना करणार आहेत. पर्वाधिराज पयुर्षण पर्वात क्षमा पर्व सर्वश्रेष्ठ आहे. आत्मशुद्धीसाठी क्षमा मागणे आणि क्षमा करणे सर्वोत्तम विधी आहे. यासाठीच पयुर्षणाचे पुर्णत्व क्षमा केल्याने होते. नुकत्याच संपलेल्या पर्युषण पर्वाच्या समापनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकल जैन समाजाच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येतो.(प्रतिनिधी)

Web Title: Jains will be honored by the saints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.