संविधानाचा आज जागर

By Admin | Updated: November 26, 2015 03:28 IST2015-11-26T03:28:08+5:302015-11-26T03:28:08+5:30

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अर्पण केले.

Jagar of the Constitution today | संविधानाचा आज जागर

संविधानाचा आज जागर

यशवंत स्टेडियमवर होणार विश्वविक्रम : १.२५ लाख विद्यार्थी करणार संविधान प्रस्तावनेचे सामूहिक वाचन
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान अर्पण केले. त्यानिमित्त हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. यंदा केंद्र-राज्य सरकारनेसुद्धा संविधान दिन उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासकीय कार्यक्रमासोबत शहरात विविध संघटनांच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने गुरुवारी संपूर्ण शहरात संविधानाचा जागर होणार आहे.
शासनाचा मुख्य कार्यक्रम हा यशवंत स्टेडियमवर होणार असून या ठिकाणी १ लाख २५ हजार विद्यार्थी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करून एक नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करणार आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे सकाळी ९ वाजता आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी राहतील. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, खासदार विजय दर्डा, खासदार अविनाश पांडे, खासदार अजय संचेती, खासदार कृपाल तुमाने, आमदार राजेंद्र मुळक, आ. नागो गाणार, आ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. सुनील केदार, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. समीर मेघे, आ. सुधाकर कोहळे, आ. आशिष देशमुख, आ, डी. मल्लिकार्जुन रेड्डी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविणायक काणे विशेषत्वाने उपस्थित राहतील.
सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी बुधवारी यशवंत स्टेडियमला भेट दिली आणि कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आ. कृष्णा खोपडे, मनपाच्या अतिरिक्त आयुक्त नयना मुंडे, कुलसचिव पूरण मेश्राम, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संचालक भाऊ दायदार, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त माधव झोड, मैत्री परिवारचे चंदू पेंडके, प्रमोद पेंडके, संजय भेंडे, मीडिया व्हेवचे अजय राजकारणे, वाहतूक शाखेचे उपायुक्त भारत तागडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही संविधान दिनी संविधान चौक येथील सकाळी ८ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येईल तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले जाईल. याप्रसंगी ई.झेड. खोब्रागडे, शिवसाद वासे, विलास सुटे, सच्चिदानंद दारुंडे, राजरतन कुंभारे, ललित खोब्रागडे, अरुण भगत, दक्षायण सोनवणे, डॉ. अनिल हिरेखण प्रामुख्याने उपस्थित राहतील.
आॅल इंडिया समता सैनिक दल
आॅल इंडिया समता सैनिक दलतर्फे गुरुवारी सकाळी ९ वाजता उंटखाना येथील केंद्रीय कार्यालयात पथसंचलन आणि संविधानाचे वाचन होईल.
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)
रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे आणि ज्येष्ठ नेते उमाकांत रामटेके यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान चौक येथे डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन. तसेच पाचपावली पोलीस स्टेशनसमोरील पक्षाच्या कार्यालयात संविधान दिनानिमित्त कार्यक्रम.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
संविधान दिनानिमित्त कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे कृष्णा इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील संघटनेच्या कार्यालयात गुरुवारी सायंकाळी ६ वाजता कार्यक्रम.
संविधान सन्मान रॅली
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी युवा संघातर्फे संविधान दिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता मैत्री बुद्ध विहार नवीन बाभुळखेडा येथे संविधान सन्मान रॅली आयोजित करण्यात आली आहे. राजेश कांबळे, भदंत हर्षदीप, भदंत जीवनज्योती प्रामुख्याने उपस्थित राहतील.
काँग्रेस
नागपूर शहर जिल्हा काँग्र्रेस कमिटीतर्फे संविधान दिनानिमित्त गुरुवारी सकाळी ११ वाजता देवडिया काँग्रेस भवन चिटणीस पार्क महाल येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शहराध्यक्ष विकास ठाकरे अध्यक्षस्थानी राहतील. या कार्यक्रमाला पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, माजी खासदार, माजी आमदार, नगरसेवक उपस्थित राहतील.
रिपब्लिकन मुव्हमेंट
संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन मुव्हमेंटच्यावतीने गुरुवारी सकाळी ११ वाजता संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येईल.

संविधान काव्य पहाट
संंविधान दिनानिमित्त सम्यक साहित्य मंचातर्फे गुरुवारी सकाळी ६.१० वाजता संविधान चौक येथे ‘संविधान काव्य पहाट’ आयोजित करण्यात आली आहे. ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर हे अध्यक्षस्थानी राहतील. माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे हे उद्घाटन करतील. प्रा. अनिलकुमार खोब्रागडे, सुधीर मेश्राम मार्गदर्शन करतील. कवी प्रकाश दुलेवाले, भाऊ पंचभाई, नीलकांत ढोले, इ.मो. नारनवरे, तन्हा नागपुरी, हृदय चक्रधर, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, ताराचंद चव्हाण, ज्ञानेश्वर वांढरे, प्रसेनजित गायकवाड, हेमलता ढवळे, प्रकाश कांबळे, रोमा हर्षवर्धन, प्रकाश पाठराबे, विशाखा नकाशे, भीमराव गणवीर, भारती मांढळकर, हरिदास बेलेकर, पल्लवी जीवनतारे, देवेंद्र बोबडे, रजनी जामगडे, मधुकर बोरीकर, मधुकर कडू, मधुकर मुनघाटे, प्रकाश निमजे, सुनील चोखारे, दीपक पंचभाई, सूर्यकांत गोरले, प्रशांत केळकर आदी कवी आपल्या रचनांनी संविधान दिनाला अभिवादन करतील.

Web Title: Jagar of the Constitution today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.