शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इतवारीत मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:35 IST

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये सोमवारी सकाळी मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली.

ठळक मुद्देदेखभालीवर प्रश्नचिन्ह : माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्यानागपूर विभागातील इतवारी रेल्वेस्थानकाच्या यार्डमध्ये सोमवारी सकाळी मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रुळावरून घसरली. अप डायरेक्शनमध्ये सकाळी ८ वाजता घडलेल्या या घटनेनंतर सकाळी ९.३० पर्यंत ही गाडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करून रेल्वेगाड्यांची ये-जा सुरु करण्यात आली.बिलासपूरकडून मुंबईकडे जात असलेली मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस रिकामी होती. ही गाडी भरलेली असती तर अधिक गंभीर स्थिती निर्माण झाली असती. या घटनेमुळे रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर कोणताच परिणाम झाला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे मिलेनियम पार्सल एक्स्प्रेस मेलच्या रुपाने धावते. यात ८ व्हिलर वाहनांची वाहतूक करण्यात येते. विभागाच्या मुख्यालयात यार्डात घडलेल्या या घटनेबाबत विभागाचे जनसंपर्क प्रभारी आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक के. व्ही. रमना यांना विचारना केली असता त्यांनी अल्प माहिती दिली. ही घटना कशामुळे घडली याची माहिती देणे त्यांनी टाळले. महाव्यवस्थापकांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये असल्याचे सांगून त्यांनी बोलणे बंद केले. ‘डीआरएम’ आणि ‘सिनिअर डीओएम’ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे रेल्वेला माल वाहतुकीद्वारे उत्पन्न मिळते. माल वाहतुक कमी झाल्यामुळे रेल्वेचे अनेक झोन चिंतेत आहेत. त्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मुख्यालयाच्या मुख्य रेल्वेस्थानकाच्या यार्डात मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर रेल्वे रुळाच्या देखभालीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. परंतु वरिष्ठ अधिकारी याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर