रिकाम्या फ्लॅटवर कर लावणे योग्यच
By Admin | Updated: July 23, 2015 03:01 IST2015-07-23T03:01:19+5:302015-07-23T03:01:19+5:30
रिकाम्या फ्लॅटवर कर लावण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे जनमंचने स्वागत केले

रिकाम्या फ्लॅटवर कर लावणे योग्यच
अनिल किलोर : अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे सर्वसामान्यांना निवारा मिळेल
नागपूर : रिकाम्या फ्लॅटवर कर लावण्याच्या अर्थमंत्र्यांच्या घोषणेचे जनमंचने स्वागत केले असून यामुळे २०२२ पर्यंत सर्वांना निवारा देण्याचे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य होणार असल्याचे जनमंचचे अध्यक्ष अॅड अनिल किलोर यांनी म्हटले आहे.
अर्थमंत्र्यांच्या घोषणेमुळे फ्लॅटमध्ये गुंतवणूक करणारे आयकर विभागाच्या कक्षेत येणार आहेत. आवश्यकता नसताना फ्लॅटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत असल्यामुळे फ्लॅटच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत.
नागरिकांना १०० चौरसफूटांचे घर घेणे अवघड झाले असून भ्रष्टाचारात कमविलेला पैसा फ्लॅटमध्ये गुंतविण्यात येत आहे. त्यामुळे शासनाने शेअर मार्केटच्या डी मॅट अकाऊंटप्रमाणे प्रॉपर्टी इंडेक्स क्रमांक लागू करणे गरजेचे आहे. त्यासाठी जनमंचने पंतप्रधानांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत पत्रव्यवहार करून सातत्याने मागणी केली. परंतु कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही.
अर्थमंत्र्यांच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना निवारा देण्याचे उद्दिष्ट सफल होईल, असा विश्वास जनमंचचे अध्यक्ष अॅड अनिल किलोर यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)