शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मित्रानेच केला घात, चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न

By योगेश पांडे | Updated: August 22, 2023 17:15 IST

वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : एका ३५ वर्षीय व्यक्तीचा त्याच्याच मित्राने जीव घेण्याचा प्रयत्न केला. आरोपी मित्राने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने फिर्यादीच्या पोटावर चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोटावरील चाकूचा वार मांडीवर बसला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

नजीम उर्फ खलील उर्फ ताजीम खान (३५, बाबा फरीदनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास नजीमला त्याचा मित्र शेख इक्बाल शेख अन्वर (४२, निराला सोसायटी, मोठा ताजबाग) याचा फोन आला. त्याने नजीमला चकोले वाडी रोड, खरबी येथे बोलविले. नजीम तेथे पोहोचला असता तेथे शेख इक्बालसोबत मंगल रमेश श्रीवास्तव (२८, नवनाथ नगर, खरबी), प्रफुल्ल उर्फ पक्या ताराचंद चौधरी (२८, दिघोरी) हे उपस्थित होते. त्यांनी नजीमला शेख इक्बाल व कल्लू नावाच्या व्यक्तीमध्ये झालेल्या भांडणाबाबत विचारणा केली. मल काहीही माहिती नाही असे नजीमने सांगितले असता मंगलने त्याच्या पोटावर चाकूने वार केले.

समयसूचकता दाखवून नजीम पलटल्याने मांडीला चाकू लागला. त्यानंतर नजीमने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पक्याने पकडून ठेवले होते. शेख इक्बालने नजीमच्या मांडीवर व दोन्ही पायांवर चाकूने वार करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपी फरार झाले. नजीमला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले असून प्रकृती गंभीर आहे. नजीमच्या तक्रारीवरून तीनही आरोपींविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी तीनही आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर