जिवंतपणीच तो झाला देव!

By Admin | Updated: May 14, 2014 00:11 IST2014-05-14T00:11:54+5:302014-05-14T00:11:54+5:30

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.

It was God! | जिवंतपणीच तो झाला देव!

जिवंतपणीच तो झाला देव!

राजुरा अपघाताला कलाटणी : याची डोळा मरण पाहिले

विठ्ठल कांबळे - घाटंजी

त्याचे नाव बंडू. तो भविष्य बघून उदरनिर्वाह करतो. एकदिवस त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी घरी धडकते, पाठोपाठ त्याचा अंत्यसंस्कारही होतो. प्रथेप्रमाणे त्याची प्रतिमा देवघरात ठेवली जाते.आणि दुसर्‍यादिवशी निरोप येतो,बंडू जिवंत आहे.!तो जिवंतपणीच देव झाला. बंडूला गावी आणण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्याला जिवंत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. जिवंतपणी मृत्यू अनुभवण्याचा प्रसंग यवतमाळ जिल्ह्यातील करमना येथील बंडू मांडवकर या तरुणावर आला.बंडू जिवंत आहेपुन्हा गाडी करून नातेवाईक राजुरा येथे गेले. बंडूला पाहून आनंदित झाले. त्याला गावी घेवून आले. तो खापरी येथे नातेवाईकाकडे आला आणि लोकांनी त्यास पाहण्यास एकच गर्दी केली. इकडे नातेवाईक व कुटुंबाच्या मनात धस्स झाले.

घाटंजी तालुक्यातील करमना येथे गुलाब मांडवकर आपल्या परिवारासह राहतात. त्यांना चार मुलं. तिसर्‍या नंबरचा बंडू नावाचा मुलगा. त्याला दोन अपत्य आहेत. तो आठ वर्षांपूर्वी गावातून निघून गेला. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुराजवळील रामपूर येथे तो वास्तव्यास होता. आजूबाजूच्या गावात जाऊन लोकांचे भविष्य पाहून तो आपला उदरनिर्वाह करीत होता.

५ मे रोजी त्याच्या मुलीचे गावात लग्न झाले. अन् ६ मे रोजी सकाळी करमना येथे त्याच्या घरी बंडूचे अपघातात निधन झाल्याचा दूरध्वनी आला. तेव्हा त्याचे वडील, भाऊ, पत्नी व नातेवाईक राजुरा येथे पोहोचले. प्रेत दाखविण्यात आले. चेहरा ओळखू येत नव्हता पण चेहर्‍याची ठेवण व शरीरयष्टी यावरून हा आपलाच बंडू आहे, अशी ओळख पटविली. ४ वाजता शवविच्छेदन करण्यात आले. प्रेत ताब्यात घेतले. बर्फाची लादी घेवून प्रेत गावी आणले. आंघोळ घालता येत नसल्याने पायावरच पाणी टाकण्यात आले. गावकरी नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रीतिरिवाजाप्रमाणे तिसर्‍या दिवसाचा विधी केली आणि चौथ्या दिवशी देवकारण केले. बंडूच्या नावे चांदीचा देव करण्यात आला. तो देव्हार्‍यात ठेवण्यात आला. गरिबीत गरिबी सुमारे २५ हजार रुपये या सर्व विधीवर खर्च करण्यात आला. बंडू तर गेला. त्याच्या आठवणीत त्याचे कुटुंब अश्रू ढाळीत होते आणि अचानक सोमवार १२ दि. मे रोजी सकाळी ८ च्या सुमारास राजुर्‍यावरून पुन्हा एकदा दूरध्वनी आला

Web Title: It was God!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.