आयटी पथक नागपुरात दाखल

By Admin | Updated: November 26, 2014 01:09 IST2014-11-26T01:09:09+5:302014-11-26T01:09:09+5:30

विधिमंडळातील संगणक व्यवस्थेचे काम सांभाळणारी आयटी चमू नागपुरात दाखल झाली असून, सचिवालयाचे इतर कर्मचारी शुक्रवारपासून येणार आहेत.८ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी

IT squad filed in Nagpur | आयटी पथक नागपुरात दाखल

आयटी पथक नागपुरात दाखल

विधिमंडळ अधिवेशन: कर्मचाऱ्यांच्या गाळ्यांची रंगरगोटी
नागपूर : विधिमंडळातील संगणक व्यवस्थेचे काम सांभाळणारी आयटी चमू नागपुरात दाखल झाली असून, सचिवालयाचे इतर कर्मचारी शुक्रवारपासून येणार आहेत.८ डिसेंबरपासून विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनास सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वतयारीची कामे सुरू झाली आहेत. सचिवालयाचे कामकाज २८ तारखेपासून सुरू होणार असल्याचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सोमवारी जाहीर केले आहे. सचिवालयाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी तेथील संगणक व्यवस्था संचालित होणे गरजेचे आहे. त्यासाठी मंगळवारी २० जणांचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले. ते बुधवारपासून त्यांच्या कामाला सुरुवात करणार आहेत.
निवास व्यवस्थेचे काम सुरू
दरम्यान, मुंबईहून येणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था सिव्हील लाईन्समधील १६० खोल्यांच्या गाळ्यात केली जाते. तेथील खोल्यांची डागडुजी आणि रंगरंगोटीची कामे सुरू झाली आहेत. १६० खोल्यांचे गाळे असे या खोल्यांचे नामकरण झाले असले तरी प्रत्यक्षात त्या १९६ खोल्या आहेत. प्रत्येकी तीन खोल्यांचे एक घरच कर्मचाऱ्यांना विधिमंडळ अधिवेशन काळात राहण्यासांठी दिले जाते. एकूण २१ बरॅकमध्ये या खोल्या विभाजित करण्यात आल्या असून, त्यापैकी तीन बरॅक नादुरुस्त असल्याने बंद आहेत. त्यामुळे एकूण १६४ खोल्या वापरात आहेत. याशिवाय नव्याने बांधलेल्या इमारतीत ६४ खोल्या आहेत. या सर्व खोल्यांमध्ये सचिवालयाचे कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांची निवास व्यवस्था दरवर्षी केली जाते. सुशिक्षित बेरोजगार कंत्राटदारांच्या संघटना तसेच मजूर सहकारी संस्थांच्या माध्यमातून या खोल्यांची देखभाल-दुरुस्ती केली जात असून या कामाला सुरुवात झाली आहे. या सर्व खोल्यांमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. भोजनगृहाची व्यवस्थाही येथे आहे. (प्रतिनिधी)

Web Title: IT squad filed in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.