शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

बंदोबस्तात एवढे मनुष्यबळ नेहमीसाठी गुंतविणे शक्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 10:52 IST

दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देजनता सहकार्य करेल अशी अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘जनता कर्फ्यू’दरम्यान दाखविलेले गांभीर्य नागरिकांकडून कायम राहिले तर निश्चितच ‘कोरोना’वर मात होऊ शकेल. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे, घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्हेगारांची धरपकड आणि गुन्हे होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे दर दिवशी पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त रस्त्यावर लावणे शक्य नाही, असे स्पष्ट मत शहर पोलीस आयुक्त डॉ भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.

‘जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला. रस्त्यावर नागरिकांची गर्दी होईल, त्यांना आवरावे लागेल, अशी कुठेही स्थिती निर्माण झाली नाही. पोलिसांनी या दोन दिवसात १४ - १४ तास कर्तव्य सांभाळले. शहरात १५० फिक्स पॉईंट लावण्यात आले होते. रस्तेच नव्हेतर गल्लीबोळातही पोलिसांची १७५ वाहने फिरत होती. पोलीस कर्मचारी आणि ठाणेदारच नव्हे तर स्वत: वरिष्ठ पोलीस अधिकारीही या दोन दिवसात रात्रंदिवस रस्त्यावर होते. मी स्वत: शहरातील सर्वच भागात फिरलो. नागरिक स्वयंस्फूर्तीने त्यांच्या घरात असल्याचे दिसून आले. नागरिकांचा हा समंजसपणा नागपुरातील कोरोनाचा संसर्ग कमी करेल, असा विश्वास या दोन दिवसाच्या जनता कर्फ्यूमुळे निर्माण झाला आहे, असे मत पोलीस आयुक्तांनी व्यक्त केले.आवश्यक तेथे नाकेबंदी, फिक्स पॉईंटयापुढेही शहरातील विविध भागात आवश्यक त्या ठिकाणी पोलिसांची नाकेबंदी आणि फिक्स पॉईंट नियमित राहील, असे डॉ. उपाध्याय यांनी स्पष्ट केले. नागरिकांचे सहकार्य पोलिसांना अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस