शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

‘तो’ व्यापारी अद्याप फरार, तांदळाचे नमुने तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:16 AM

उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़

ठळक मुद्देउमरीतील तांदूळ प्रकरण तहसीलदार म्हणतात तो तांदूळ नेमका कुठून आला याची खातरमजा करणे आवश्यक

उमरी : उमरीमार्गे नांदेडकडे काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या स्वस्त धान्याच्या ट्रक जप्ती प्रकरणातील आरोपी असलेला धर्माबाद येथील व्यापारी अद्याप फरार आहे़ जप्त झालेल्या तांदळाचे नमुने परभणी येथे फॉरेन्सिक प्रयोगशाळेला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत़२५ टन तांदूळ भरून असलेला ट्रक उमरीमार्गे नांदेडकडे जात असताना उमरी पोलिसांनी पकडला़ २२ मार्च रोजी दुपारी ही कारवाई करण्यात आली़ (एम़एच़२६-६८३०) या क्रमांकाचा हा ट्रक सध्या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये जप्त करून उभा करण्यात आला आहे़ साडेपाच लाख रुपये किमतीच्या या तांदूळ प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे करीत आहेत़ या प्रकरणी चौकशीसाठी त्यांनी धर्माबाद येथे प्रत्यक्ष जावून माहिती घेतली़ आरोपी असलेले व्यापारी शेख अजीम अब्दुल रहीम रा़ बाळापूर ता़ धर्माबाद यांचे धर्माबाद येथे अडत दुकान आहे़ मात्र ते दुकानात आढळून आले नाहीत़ त्यांचा भाऊ पोलीस अधिकाऱ्यांना भेटला़ ट्रकचालक रमेश लालू वाघमारे (रा़ नावंदी ता़ नायगाव) याच्याकडे सदर तांदळाच्या खरेदी पावत्या किंवा माल पोचविण्यासाठीचे संबंधित व्यापा-याचे पत्र अशी कुठलीच कागदपत्रे आढळून आली नाहीत़ म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक सुर्वे यांनी दिली़

उमरी पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रकमधील तांदूळ स्वस्त धान्याचाच आहे का इतर कोणता आहे? याची अद्याप खात्री झाली नाही़ म्हणून तांदळाचे नमुने तपासणी झाल्यावरच खरा प्रकार उघडकीस येईल़ मात्र तांदूळ उमरी तालुक्यातील नाही़ जप्त झालेला हा ट्रक धर्माबाद येथून भरलेला होता़ ट्रक चालकाने तसा जबाब दिला आहे - डॉ़ मृणाल जाधव, तहसीलदार, उमरी़

टॅग्स :NandedनांदेडfraudधोकेबाजीPoliceपोलिसNanded policeनांदेड पोलीस