शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी प्रमाणपत्र देणे सरकारच्या हाती नाही, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 13:07 IST

Maratha Reservation: सरसकट कुणबी किंवा कोणत्याही जातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही. तसे करून मराठा समाजाला आरक्षण दिले तरी सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

नागपूर : सरसकट कुणबी किंवा कोणत्याही जातीचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार सरकारला नाही. तसे करून मराठा समाजाला आरक्षण दिले तरी सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही. त्यामुळे घाबरू नका, तुमचे आरक्षण कुणीही काढून घेऊ शकत नाही, असे मत माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी व्यक्त केले.

सर्व शाखीय कुणबी, ओबीसी कृती समितीतर्फे संविधान चौकात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सोमवारी कोळसे पाटील यांनी भेट दिली. यावेळी  त्यांनी ओबीसी आरक्षण बळकटीसाठी कायद्याची बाजू किती महत्त्वाची आहे, याची माहिती दिली.

ते म्हणाले, केंद्र सरकारने राज्य सरकारचे आरक्षणाचे अधिकार आधीच काढून घेतले आहेत. आता आरक्षण देण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातूनच निर्णय करावा लागेल. दोन समाजांनी आपसात भांडून कुणाला आरक्षण मिळणार नाही व कुणाचे कमी  होणार नाही. 

आव्हान देणारे कोण होते ते ओळखा...nमराठा समाज बांधवांना यापूर्वी आरक्षण दिले होते. पण ते सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. nया आरक्षणाला न्यायालयात आव्हान देणारे कोण होते, ते ओळखा, असे आवाहनही माजी न्यायमूर्ती काेळसे पाटील यांनी केले. nसंविधान चौकात ओबीसी संघटनांकडून सुरू करण्यात आलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही परिसरातील विविध संस्था, संघटनांतर्फे पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण