शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सरकारला टॅक्स हटविणे अशक्य; पेट्रोल-डिझेलच्या मुद्द्यावर बाबा रामदेवांनी असा केला सरकारचा बचाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2021 22:16 IST

योग गुरू बाबा रामदेव यांनीही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसंदर्भात भाष्य केले आहे. मात्र, या मुद्द्यावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा बचाव केला आहे.

नागपूर -पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सातत्याने वाढत असलेल्या इंधनाच्या दरामुळे सर्वासामान्य नागरीक त्रस्त झाला आहे. यामुद्द्यावरून विरोधकही सरकारवर सातत्याने निशाणा साधताना दिसत आहेत. यातच आता योग गुरू बाबा रामदेव यांनीही पेट्रोल आणि डिझेल दरवाढीसंदर्भात भाष्य केले आहे. मात्र, या मुद्द्यावरून त्यांनी केंद्रातील मोदी सरकारचा बचाव केला आहे.

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त, रविवारी २४ ऑक्टोबरला नागपुरात राष्ट्रीय आंतरधर्मीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सामाजिक सौहार्दाबाबत वैश्विक आव्हाने व भारताची भूमिका’ या विषयावर या परिषदेमध्ये विविध धर्मांच्या आचार्यांच्या उपस्थितीत महामंथन होणार आहे. या परिषदेसाठी स्वामी रामदेव यांचे आज नागपुरात आगमन झाले. त्यावेळी त्यांनी चालू घडामोडींवर आपली रोखठोक मते मांडली.

बाबा रामदेव म्हणाले, "जर कच्च्या तेलाच्या किंमतीच्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल विकले गेले तर दोन्ही स्वस्त होतील. पण इंधनांवर टॅक्स लावला जातो. सरकार तसेच देशाची अर्थव्यवस्था चालविण्यासाठी हे आवश्यक आहे. यामुळेच सरकारला टॅक्स हटविणे अशक्य होत आहे. मात्र, कधी ना कधी हा टॅक्स नक्कीच हटेल आणि पेट्रोल-डीझेल स्वस्त होईल."

 

बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक -यावेळी बाबा रामदेव यांनी ड्रग्स आणि बॉलिवूड वरही भाष्य केले. बॉलिवूडमध्ये नशेचा जो कचरा झाला आहे, तो समाजासाठी घातक असल्याचे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. एवढेचन नाही, तर हा कचरा सर्वांनी मिळून साफ करायला हवा, असेही रामदेव यावेळी म्हणाले. सध्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान आणि बॉलीवूडची उद्योन्मुख अभिनेत्री अनन्या पांडे यांची ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -- बॉलिवूडमधील नशेचा कचरा समाजासाठी घातक;सर्वांनी मिळून साफ करण्याची गरज- रामदेवबाबाभारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होणे हे राष्ट्रहिताच्या विरोधात; योगगुरू रामदेवबाबा 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाPetrolपेट्रोलDieselडिझेलNarendra Modiनरेंद्र मोदी