शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

गोवारी व्यक्तीला अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 9:37 PM

गोवारी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केशव सोनेने या व्यक्तीला नुकतेच गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.

ठळक मुद्देहायकोर्टात सरकारची माहिती : ऐतिहासिक निर्णयाचा परिणाम

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गोवारी ही जात अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये मोडते असा ऐतिहासिक निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अरुण उपाध्ये यांनी १४ आॅगस्ट २०१८ रोजी दिला होता. त्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने केशव सोनेने या व्यक्तीला नुकतेच गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र जारी केले आहे. राज्य सरकारने शुक्रवारी उच्च न्यायालयाला ही माहिती दिली.पडताळणी समितीने सुरुवातीला सोनेने यांचा गोवारी अनुसूचित जमाती प्रवर्गाचे वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा दावा फेटाळला होता. त्यामुळे त्यांनी २००७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर काही संघटनांनी गोवारी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ मिळण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केल्या. १४ आॅगस्ट २०१८ रोजी न्यायालयाने त्या सर्व याचिका निकाली काढून वरील ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी न्यायालयाने सोनेने यांच्या दाव्यावर सहा आठवड्यात नव्याने निर्णय घेण्याचा आदेश पडताळणी समितीला दिला होता. त्यानुसार समितीने नव्याने निर्णय घेऊन सोनेने यांचा दावा मंजूर केला.अनुसूचित जमाती प्रवर्गाचे लाभ मिळावे याकरिता गोवारी समाज २३ वर्षांपासून संघर्ष करीत होता. न्यायालयाच्या सकारात्मक निर्णयामुळे स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांचा लढा यशस्वी ठरला. महाराष्ट्रामध्ये गोंड-गोवारी अशी स्वतंत्र जमात अस्तित्वात नाही. गोंड-गोवारी संबोधले जात असलेले सर्वजण गोवारी आहेत. गोंड-गोवारी ही गोंड जमातीची उपजमातही नाही. गोंड व गोवारी या दोन भिन्न जमाती आहेत. गोंडाप्रमाणे गोवारीदेखील आदिवासीच आहेत. त्यामुळे गोवारींना अनुसूचित जमातीचे लाभ नाकारले जाऊ शकत नाही असे निरीक्षण न्यायालयाने आपल्या ऐतिहासिक निर्णयात नोंदविले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCaste certificateजात प्रमाणपत्र