शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रला पुनर्जिवीत करण्याचा मुद्दा : भाजपात वाढली अस्वस्थता, बोलावली विशेष सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 00:32 IST

नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) ला पुन्हा नियोजन प्राधिकरणाच्या रुपाने मंजुरी प्रदान करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सत्तारुढ भाजपासोबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा हवाला देऊन नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)च्या प्लानिंग अ‍ॅथारिटीचे अधिकार काढून महापालिकेच्या नगररचना विभागाला देण्याचा निर्णय मागील सरकारने घेतला होता. परंतु पुन्हा एकदा नागरिकांशी निगडित अपुर्ण कामे व ले-आऊटच्या विकासासाठी प्रन्यासला पुन्हा नियोजन प्राधिकरणाच्या रुपाने मंजुरी प्रदान करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या सत्तारुढ भाजपासोबत पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषद घेऊन नासुप्रला पुनर्जिवीत केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. आगामी २७ जानेवारीला महापालिकेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. सूत्रांनुसार महापौर संदीप जोशी यांनी संबंधित विषयासाठी विशेष सभा घेण्याचे पत्र प्रशासनाला दिले आहे. त्यानंतर घाईगडबडीत विषय पत्रिका काढण्यात आली. नियमानुसार विशेष सभेच्या तीन दिवसांपूर्वी विषय पत्रिका काढणे आवश्यक आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस चर्चेसाठी ठरला. नासुप्रचे अधिकार काढण्याचा आदेश मागील सरकारने काढला होता. परंतु कर्मचाऱ्यांचे समायोजन, ले-आऊट, नासुप्रच्या मालकीची संपत्ती महापालिकेच्या सुपूर्द करण्याचा आदेश जारी झाला नाही. त्यामुळे महापालिकेच्या नगररचना विभागाला केवळ नासुप्रच्या अधीन असलेल्या संपत्तीचा नकाशा मंजुरीचे अधिकार मिळाले. नासुप्रमध्ये २ लाखाच्या जवळपास फाईल आहेत. परंतु ५७०० फाईलच महापालिकेत पोहोचल्या. भाजपाने मागील निवडणुकीत नासुप्रच्या बरखास्तीचे श्रेय लाटले. परंतु अपूर्ण हस्तांतरणामुळे चार महिन्यांपासून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर येताच डॉ. नितीन राऊत यांना पालकमंत्री करण्यात आले. त्यांनी पत्र लिहून मनपातर्फे गुंठेवारी ले-आऊटच्या नियमितीकरणाचे काम असमाधानकारक असल्याचे सांगितले.चर्चेमुळे कुणाचा होणार फायदाकाही दिवसांपूर्वी महापालिकेच्या आमसभेत भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांनी नासुप्रच्या फाईल आल्या नसल्याचा मुद्दा उचलला. महापौर संदीप जोशी यांनी गुंठेवारी प्लॉटसाठी वेगळ्या कक्षाची घोषणा केली होती. नगररचना विभागातर्फे पत्र जारी होताच भाजपात खळबळ उडाली. विशेष सभेतील चर्चेतून काय मिळेल हा मोठा प्रश्न आहे. भाजपाचे नेते व नगरसेवक नासुप्रला पुनर्जिवित करण्याच्या बाजूने दिसले. सूत्रानुसार चर्चा आयोजित करून भाजपा कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नागरिकांच्या विरोधात असल्याचे दाखवू पाहत आहे. विशेष सभेत महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचे स्वागत नगरसेवक करू शकतात.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यासBJPभाजपा