कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णांचे हॉटेलमध्ये विलगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 09:10 PM2020-10-02T21:10:38+5:302020-10-02T21:12:20+5:30

Corona, patients, hotel, quarantine, Nagpur News विलगीकरणातील कोरोना रुग्णांनी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हॉटेल्सचा सहारा घेतला आहे. याकरिता काही रुग्णालयांनी हॉटेल्सशी करार केला असून रुग्णांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे.

Isolation of Corona patients in the hotel for the safety of the family | कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णांचे हॉटेलमध्ये विलगीकरण

कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी कोरोना रुग्णांचे हॉटेलमध्ये विलगीकरण

Next
ठळक मुद्देकमी पॅकेजमुळे काही हॉटेल फुल्ल : रुग्णालयाकडून वैद्यकीय सेवा उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विलगीकरणातील कोरोना रुग्णांनी कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी हॉटेल्सचा सहारा घेतला आहे. याकरिता काही रुग्णालयांनी हॉटेल्सशी करार केला असून रुग्णांना त्या ठिकाणी ठेवण्यात येत आहे. याशिवाय वैद्यकीय सेवाही देण्यात येत आहे. कोरोना रुग्णांना मिळणाऱ्या स्वस्तातील पॅकेजमुळे नागपुरातील काही हॉटेल्स सध्या फुल्ल आहेत.
आर्थिक क्षमतेनुसार कोरोनाची कमी लक्षणे असलेले रुग्ण हॉटेल्सला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी हॉटेल्सला केवळ विलगीकरणासाठी परवानगी दिली होती. पण मनपा प्रशासनाने रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल्सना कोरोना रुग्ण ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण भविष्यातील सुरक्षेच्या कारणांनी अनेक हॉटेल्सनी परवानगी नाकारली आहे. याची माहिती मनपाला देण्यात आली आहे. काही हॉटेल्सनी कर्मचाऱ्यांची मंजुरी घेऊनच कोरोना रुग्णांना ठेवण्याची परवानगी दिली आहे. सध्या अशा हॉटेल्सच्या खोल्या हाऊसफुल्ल आहेत. अशा कठीणसमयी हॉटेल्ससाठी सुवर्णसंधी चालून आली आहे.
करारांतर्गत नागपुरातील काही हॉटेल्स रुग्णांकडून राहण्यासाठी दरदिवशी ३ ते ५ हजार रुपये आकारत आहेत. यात सर्व सोयीसुविधांचा समावेश आहे. याशिवाय डॉक्टरांच्या उपचाराचा खर्च वेगळा द्यावा लागत आहे. याउलट कमी लक्षणे असलेले रुग्ण रुग्णालयात राहिल्यास त्यांना दरदिवशी किमान २५ ते ३० हजार रुपयांचा खर्च येतो. अशा स्थितीत संपूर्ण पॅकेजअंतर्गत रुग्णांना ५० ते ६० हजार रुपयांचा खर्च येत आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका रुग्णाने सांगितले, विलगीकरण अथवा रुग्णालयात उपचार घेण्याऐवजी हॉटेलमध्ये राहण्याचा उत्तम पर्याय आहे. हॉटेल संचालक आणि कर्मचारीउत्तम सेवा देत आहेत. याशिवाय कुटुुंबीय आणि भीतीच्या वातावरणापासून दूर राहण्यास मदत मिळत आहे. आवश्यकतेवेळी करार केलेल्या रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून तात्काळ वैद्यकीय सेवा मिळत आहे.

काहीच हॉटेल्सचा रुग्णालयासोबत करार
नागपुरातील काहीच हॉटेल्सनी रुग्णालयासोबत करार केला असून त्या अंतर्गत कमी लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना ठेवण्यात येत आहेत. यामध्ये मोठ्या हॉटेल्सचा समावेश नाही. कर्मचाऱ्यांअभावी काही हॉटेल्सनी ही सेवा सुरू केलेली नाही.
तेजिंदरसिंग रेणू, अध्यक्ष, नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल्स असोसिएशन.

Web Title: Isolation of Corona patients in the hotel for the safety of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app