शहरं
Join us  
Trending Stories
1
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
2
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
3
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
4
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
5
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
6
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
7
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
8
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
9
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
10
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
11
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
12
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
13
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
14
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
17
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

सिंचन घोटाळ्यात अधिका-यांवर ठपका; नागपुरात चार गुन्हे दाखल, ‘एसीबी’च्या तक्रारीत मात्र राजकीय नेत्यांचा उल्लेख नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 5:58 AM

नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आज अचानक सक्रिय होत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. सिंचन विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत तसेच ...

नागपूर : हिवाळी अधिवेशनामुळे राजकीय वातावरण गरम झाले असतानाच गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहार प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)ने आज अचानक सक्रिय होत नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल केले. सिंचन विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदारांवर ठपका ठेवण्यात आला आहे.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणा-या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील विविध कामांच्या निविदा प्रक्रियेत तसेच बांधकामातगैरप्रकार झाल्याचा जोरदार आरोप झाला होता. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी नागपूर एसीबीला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार, स्थानिक युनिटचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या नेतृत्वात एसीबीच्या पथकाने या गैरव्यवहाराची प्रदीर्घ चौकशी केली.या चौकशीमध्ये संबंधित कामाच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचेउघड झाले. जलसंपदा विभागातील तत्कालीन अभियंते, विभागीयलेखाधिकारी तसेच कालव्याच्या कामाचे कंत्राटदार, त्यांचे भागीदार, आममुखत्यारपत्रधारक यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले होते.हा चौकशी अहवाल चौकशी अधिकाºयांनी सादर केल्यामुळे मंगळवार, १२ डिसेंबरला एसीबीच्या अधिकाºयाने नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.तक्रार काय होती?मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेच्या नवतळा, मेटेपार, चिखलापार शाखा कालव्यांचे मातीकाम, बांधकाम आणि अस्तरीकरणाच्या कामाच्या निविदा प्रक्रियेत नियमबाह्य अद्ययावतीकरण करून निविदेचे मूल्य वाढवण्यात आले. तसेच अवैधस्तरावर निविदेला स्वीकृती/मंजुरी देण्यात आली. पूर्वअर्हता अर्जाच्या छाननीदरम्यान अपात्र कंत्राटदाराला गैरमार्गाचा अवलंब करून पात्र ठरविण्यात आले. संबंधित कंत्राटदाराने प्रतिस्पर्धी कंत्राटदाराचे बयाणा रकमेचे ‘डीडी’ देऊन निविदा प्रक्रियेदरम्यान संगनमत करून गैरव्यवहार (कार्टेलिंग) केल्याचा आरोप तक्रारीत केला होता.यांच्यावर गुन्हा दाखलउमाशंकर पर्वते (कार्यकारी अभियंता), सी. टी. जीभकाटे (विभागीय लेखाधिकारी), डी. डी. पोहेकर (अधीक्षक अभियंता), सो. रा. सूर्यवंशी (मुख्य अभियंता), दे. पा. शिर्के (कार्यकारी संचालक) तसेच ए. जी. भांगडिया, नागपूर या फर्मचे आममुखत्यारपत्रधारक फिरदोस खान पठाण यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

टॅग्स :DamधरणCrimeगुन्हा