शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

सिंचन घोटाळा : नागपूर परिक्षेत्रामध्ये २० एफआयआर दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 01:07 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारामध्ये आवश्यक चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी पाच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आठ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सात प्रकरणांमध्ये एसआयटीचा तपास सुरू आहे.

ठळक मुद्देविदर्भातील सिंचन घोटाळा : हायकोर्टात एसीबीचे प्रतिज्ञापत्र

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रात येणाऱ्या सिंचन प्रकल्पातील गैरव्यवहारामध्ये आवश्यक चौकशी केल्यानंतर आतापर्यंत २० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. त्यापैकी पाच प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. आठ प्रकरणांचा तपास पूर्ण झाला असून आरोपी अधिकाऱ्यांविरुद्ध दोषारोपपत्रे दाखल करण्याची परवानगी मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. सात प्रकरणांमध्ये एसआयटीचा तपास सुरू आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली. प्रतिज्ञापत्रातील पुढील माहितीनुसार, १९ जुलै २०१८ नंतर तीन प्रकरणांत दोषारोपपत्रे दाखल करण्यात आलीत. त्यात गोसेखुर्द उजव्या कालव्याचे आरडी ९१ ते ९९ किमीपर्यंतचे मातीकाम व इतर कामात झालेला गैरव्यवहार, मोखाबर्डी सिंचन योजनेंतर्गत येणाºया नक्षी शाखा कालवा व चार वितरिकेच्या कामात झालेला गैरव्यवहार आणि घोडाझरी शाखा कालव्याचे मातीकाम व इतर कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणाचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे वगळता अन्य २० प्रकरणांपैकी एका प्रकरणामध्ये नागपूर एसआयटीला दखलपात्र गुन्हा आढळून आला नाही. त्यामुळे एसीबी मुख्यालयाने प्रकरण बंद करण्याची परवानगी दिली आहे. सात प्रकरणामधील चौकशी अंतिम टप्प्यात आहे तर, १२ प्रकरणे चौकशीकरिता प्रलंबित आहेत.विदर्भातील सिंचन प्रकल्पांची सद्यस्थिती सांगाविदर्भातील किती सिंचन प्रकल्पांचे काम पूर्ण झाले आहे, किती सिंचन प्रकल्पांचे काम रखडले आहे, रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल इत्यादी मुद्यांवर दोन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यासंदर्भात जनमंच संस्था व व्यावसायिक अतुल जगताप यांच्या जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. विदर्भातील बºयाच सिंचन प्रकल्पांचे काम रखडले असून, त्याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब होत असल्यामुळे दरवर्षी बांधकाम खर्च वाढत आहे. शेतकºयांपर्यंत सिंचनाचे लाभ पोहोचविण्यासाठी हे प्रकल्प घोषित करण्यात आले होते. परंतु, लाखो शेतकरी आजही सिंचनाची प्रतीक्षा करीत आहेत. प्रकल्पांचे मूळ उद्देश पूर्ण झाले नाहीत, असे याचिकाकर्त्यांनी सुनावणीदरम्यान न्यायालयाला सांगितले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सरकारला हा आदेश दिला.रखडलेल्या सिंचन प्रकल्पांचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, सिंचन घोटाळ्याची चौकशी तातडीने पूर्ण करण्यात यावी आणि दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, असे जनमंचचे म्हणणे आहे. जगताप यांनी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला वाटप झालेल्या चार कंत्राटांवर आक्षेप घेतला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूर रेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पाच्या कंत्राटाचा समावेश आहे. त्यांच्या याचिकेत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. अजित पवार व माजी आमदार संदीप बाजोरिया यांचे जवळचे संबंध आहेत. त्यामुळे पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना अधिकारांचा गैरवापर करून बाजोरिया कंपनीला अवैधपणे सिंचन प्रकल्पांची कंत्राटे मिळवून दिली, असे त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. फिरदोस मिर्झा व अ‍ॅड. श्रीधर पुरोहित तर, सरकारतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प