‘आयर्न लेडी’ने विकासाची दिशा दिली

By Admin | Updated: November 22, 2015 03:04 IST2015-11-22T03:04:09+5:302015-11-22T03:04:09+5:30

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक संघटनांतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली.

'Iron Lady' gave direction for development | ‘आयर्न लेडी’ने विकासाची दिशा दिली

‘आयर्न लेडी’ने विकासाची दिशा दिली

इंदिरा गांधी यांची जयंती साजरी : काँग्रेससह संघटनांतर्फे अभिवादन
नागपूर : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती काँग्रेस पक्षासह विविध सामाजिक संघटनांतर्फे उत्साहात साजरी करण्यात आली. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटावचा नारा देत सर्वसामान्य माणसाच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. ‘आयर्न लेडी’ने कठीण प्रसंगात कणखर भूमिका घेत देशाला सावरले. त्यांच्या नेतृत्त्वात देशाने प्रगती केली, अशा शब्दात गौरव करीत आदरांजली अर्पण करण्यात आली.
युवक काँग्रेस
युवक काँग्रेतर्फे चिचार ओळीतील गांधी पुतळा चौकात दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना अभिवादन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शहर काँग्रेसचे सरचिटणीस अतुल कोटेचा होते. या वेळी कोटेचा म्हणाले, इंदिरा गांधी या आयर्न लेडी होत्या. गरिबी हटावचा नारा दिला. फक्त विदेश दौरे न करता देशातील गोरगरिब जनतेच्या विकासासाठी काम केले. देशाला एकसूत्र व एकसंध ठेवण्याचे काम केले. या वेळी रिंकू जैन, श्रीकांत ढोलके, लोकेश बरडिया, मोजाहिद खान, आकाश गुजर, आकाश चौरीया आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा फ्रंट
राष्ट्रीय युवा फ्रंटके अध्यक्ष पिंटु बागडी यांच्या अध्यक्षतेखाली इतवारी शहीद चौक येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी माजी खा. गेव्ह आवारी, काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे, नगरसेविका आभा पांडे, सुरेश आगरेकर, अंकुश बागडी, दीपक बागडी, अ‍ॅड. मंगेश भावडकर, विरथ सोनी, कार्तिक सुखदेवे, राकेश बडकुर, राजेश जैन, वसंता मोहनकर, विकास चौधरी, अमोल अवचट आदी उपस्थित होते.
उंटखाना काँग्रेस
उंटखाना येथे नगरसेविका सुजाता कोंबाडे यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या वेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विठ्ठलराव कोंबाडे, सुजाता सुके, सुधाबाई कांबळे, गिताबाई लुटे, निमा रामटेके, प्रभा महाडिक आदी उपस्थित होते.
दिशा सामाजिक संघटना
दिशा सामाजिक सांस्कृतिक संकल्पना द्वारे फुटाळा तलाव परिसर येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी नानाभाऊ घोडमारे होते. प्रमुख अतिथी म्हणून नाना ठाकरे, तुषार हाडगे, राजेश दोहाते आदी उपस्थित होते.
हिंगणा विधानसभा युवक काँग्रेस
युवक अध्यक्ष शशिकांत थोटे यांच्या अध्यक्षतेखाली हिंगणा येथे इंदिरा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून युवक काँग्रेसच्या रामटेक लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत होत्या. इंदिरा गांधी यांच्या रूपात देशाला सक्षम नेतृत्व मिळाले व त्यांच्या नेतृत्त्वात देशाला विकासाची दिशा मिळाली, असे मत राऊत यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सलाम अली, जावेद शेख, जयेश कोहाळ, शफी शेटे, इसाख शेख, विठ्ठल डाफ आदी उपस्थित होते.
बरडे ले-आऊट
बोरगांव- गोरेवाडा प्रभागात सामाजिक कार्यकर्ते ईश्वर बरडे यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी विलास बरडे, बबन यादव, रवी कठाळे, रवी वाघमारे, बाबू नायडू, दुर्गेश जयस्वाल आदी उपस्थित होते.
झिंंगाबाई टाकळी प्रभाग काँग्रेस कमिटी
झिंगाबाई टाकळी येथे सामाजिक कार्यकर्ते नागेश राऊत यांच्या हस्ते इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. इंदिरा गांधी यांनी जनकल्याणाच्या योजना राबवून लोकसंवेचा संदेश दिला, असे मत या वेळी राऊत यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अजय इंगोले, संदीप डोये, विजय राऊत, हेमंत खाडे, विशाल राऊत, चंद्रशेखर राऊत, पिंटू चौधरी, दिनेश सिंद्राम, रमेश काथोटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: 'Iron Lady' gave direction for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.