शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

‘ड्रेक’च्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सट्टाबाजारात ‘पॉवरप्ले’; ‘किंग कोहली’च्या संघाकडेच बेटिंग साईट्सचा कल

By योगेश पांडे | Updated: June 4, 2025 00:06 IST

सामन्यादरम्यान सातत्याने ‘ऑड्स’मध्ये झाले बदल, सामन्याच्या अगोदरपासूनच सट्टाबाजाराचा ‘पीबीकेएस’पेक्षा ‘आरसीबी’कडे जास्त कल होता. श्रे

योगेश पांडेनागपूर : २००८ पासून सुरू झालेल्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच माजी कर्णधार व रन मशीन विराट कोहलीला ट्रॉफी उचलण्याची संधी मिळाली. पहिल्यांदाच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजेतेपद मिळाल्याने सट्टाबाजारात बुकींची ‘बल्ले बल्ले’ झाली.

सामन्यादरम्यान सातत्याने ‘ऑड्स’मध्ये बदल होत होते. मात्र दहाव्या षटकानंतर ‘आरसीबी’कडेच सट्टाबाजाराचे आकडे वळले. मात्र दिवसभर चर्चेचा विषय राहिला तो कॅनेडाचा प्रसिद्ध गायक ‘ड्रेक’ याने लावलेली ‘बेटिंग’. त्याने आरसीबीवर तब्बल ६.४ कोटींची बेट लावली होती व याबाबत इन्स्टाग्राम पोस्ट टाकताच ‘आरसीबी’च्या बाजूने सट्टाबाजारात अक्षरश: पॉवरप्ले प्रमाणे बेट्सचा पाऊस पडायला लागला.

सामन्याच्या अगोदरपासूनच सट्टाबाजाराचा ‘पीबीकेएस’पेक्षा ‘आरसीबी’कडे जास्त कल होता. श्रेयस अय्यरपेक्षा सट्टाबाजाराने रजत पाटीदार व विराट कोहलीवर जास्त विश्वास दाखविला होता. ‘आरसीबी’चे ऑड्स १.७५ तर ‘पीबीकेएस’वर १.९० असे ‘ऑड्स’ होते. ‘आरसीबी’ने अपेक्षेनुरुप धावा न केल्याने यात काहीसा बदल झाला होता. मात्र ‘पीबीकेएस’ची सुरुवातदेखील स्फोटक न झाल्याने परत ‘आरसीबी’वरच जास्त लगवाडी-खायवाडी सुरू झाली. ऑनलाईन संकेतस्थळांवरदेखील ‘आरसीबी’च फेव्हरेट होते. अखेर अपेक्षेप्रमाणेच निकाल आल्याने सट्टेबाजांमध्येदेखील कोहलीसाठीच चिअर्स सुरू होते.कॅनेडियन रॅपर ड्रेकने २०२४ साली कोलकाता नाईट रायडर्सवर बेटिंग केली होती व तो संघ विजयी झाला होता हे विशेष.