शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्याने राजकारण तापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 8:32 PM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच्या विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याचा विरोध केला. काही संघटनांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.

ठळक मुद्देकाँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला विरोधनागपूर विद्यापीठाने साधली चुप्पी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बीए द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात इतिहासाच्या विषयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघा(आरएसएस)चा समावेश करण्यात आला आहे. अभ्यासक्रमात संघाचा समावेश केल्यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. मंगळवारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी याचा विरोध केला. काही संघटनांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना निवेदन देऊन इशाराही दिला.विद्यापीठाच्या निर्णयाची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी टिष्ट्वटरवरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. यात त्यांचे म्हणणे आहे की, विद्यापीठाच्या बीए भाग-२ च्या इतिहासाच्या पुस्तकातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्र निर्माण कार्यात भूमिका हे शिकविताना, आरएसएसने १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा विरोध केला होता, भारतीय संविधान व राष्ट्रध्वजाचा विरोध केला होता, हे सुद्धा विद्यार्थ्यांना शिकविण्यात यावे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीसुद्धा आपल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले की, ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, स्वातंत्र्य संग्रामात गद्दारी केली, ज्यांच्या विचारामुळे महात्मा गांधींची हत्या झाली, त्यांचा इतिहास आता शिकविला जाणार आहे. राजकीय पटलावर या विषयावर चर्चा प्रतिक्रिया उमटत असताना विद्यापीठाकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शर्मा यांनी स्पष्ट केले की, यात कुठलेही राजकारण नाही. एमए इतिहासाच्या अभ्यासक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात शिकविले जात आहे. एमएच्या चौथ्या सेमिस्टरमध्ये आधुनिक विदर्भाचा इतिहास या पेपरच्या चौथ्या युनिटमध्ये संघाचा मुद्दा आहे. पदवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना याची माहिती व्हावी म्हणून बीएच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे व अन्य पदाधिकाऱ्यांनी याप्रकरणी चुप्पी साधली आहे.असे आहे प्रकरणकाही दिवसांपूर्वी विद्यापीठाने बीए द्वितीय वर्षाच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी मंजुरी दिली होती. अभ्यासक्रमात कम्युनॅलिझमचा उदय व विकास, क्रिप्स मिशन व कॅबिनेट मिशन प्लॅन यांचा समावेश करण्यात येणार होता. मात्र अभ्यासक्रमात बदल करताना कम्युनॅलिझमच्या बदल्यात देशाच्या निर्माणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थान या विषयाचा समावेश करण्यात आला. संपूर्ण अभ्यासक्रमातून कम्युनॅलिझमचा इतिहास काढून टाकण्यात आला आहे.अन्य संघटनांनीही केला विरोधराजकीय पक्षासोबतच स्थानिक संघटनांनीसुद्धा विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला. यासंदर्भात मंगळवारी शिवाजी विद्यार्थी संघाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांना निवेदन देऊन अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषय काढण्याची मागणी केली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वातसुद्धा निवेदन देण्यात आले. अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न वगळ्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी या प्रकरणी कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.अन्य संघटनांनीही केला विरोधराजकीय पक्षासोबतच स्थानिक संघटनांनीसुद्धा विद्यापीठाच्या निर्णयाचा विरोध केला. यासंदर्भात मंगळवारी शिवाजी विद्यार्थी संघाने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. काणे यांना निवेदन देऊन अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा विषय काढण्याची मागणी केली. एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष आशिष मंडपे यांच्या नेतृत्वातसुद्धा निवेदन देण्यात आले. अभ्यासक्रमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला न वगळ्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी या प्रकरणी कुलगुरूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ