एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 11:39 PM2019-08-19T23:39:52+5:302019-08-19T23:41:16+5:30

सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.

Involve SNDL employees in Mahavitran | एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

एसएनडीएल कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामील करून घ्या

Next
ठळक मुद्देऊर्जामंत्र्यांच्या घरी पोहोचले कर्मचारी : संरक्षणाचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलने महावितरणला शहरातील जबाबदारी स्वीकारण्याबाबत केलेल्या विनंतीमुळे कर्मचारी घाबरले आहेत. त्यांना आपल्या भविष्याची चिंता सतावू लागली आहे. याच चिंतेने सोमवारी सकाळी एसएनडीएलचे कर्मचारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पोहोचले. यावेळी कर्मचाऱ्यांनी एसएनडीएल कंपनी नागपुरातून जात असेल तर येथील कर्मचाऱ्यांना महावितरणमध्ये सामावून घेण्याची विनंती केली. बावनकुळे यांनीही यावेळी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले.
शहरातील तीन डिव्हिजनची वीज वितरणाची व्यवस्था एसएनडीएलकडे आहे. कंपनीने १२ ऑगस्ट रोजी महावितरणला एक पत्र पाठवून कंपनीची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याचे सांगितले आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार देण्यासही अडचण येत असल्याचे पत्रात म्हटले आहे. या पत्राची माहिती होताच कर्मचारी आपल्या भविष्याबाबत घाबरलेले आहेत.
त्यांनी सोमवारी ऊर्जामंत्र्यांना आपल्या समस्या सांगत निवेदन सादर केले. त्यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सांगितले की, कंपनी काम सोडून गेल्यास ते बेरोजगार होतील. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षात पगारात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यांना पीएलपीच्या माध्यमातून १५ ते २० टक्के वेतन दिले जाते. कंपनी व्यवस्थापनातर्फे लिखित आश्वासन मिळाल्यानंतरही त्यांना पीएलपी मिळालेला नाही. त्यामुळे ते आपल्या पगारापासूनही वंचित होत आहेत. त्यांच्याविरुद्ध बदल्याच्या भावनेने कारवाई होऊ नये. ते पूर्ण इमानदारीने काम करू इच्छितात. त्यांना केवळ आपल्या भविष्याची चिंता आहे.
प्रादेशिक संचालक ऐकणार समस्या
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी कर्मचाऱ्यांना आश्वस्त केले की, सरकार त्यांच्या हिताचे रक्षण करेल. त्यांनी महावितरणचे कार्यकारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांना फोन करून कर्मचाºयांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून समस्या सोडविण्याचे निर्देश दिले.
चर्चा योग्य दिशेने सुरू
एसएनडीएल कंपनीची महावितरण आणि बँकांसोबत योग्य दिशेने चर्चा सुरू आहे. कंपनी केवळ आपल्या आर्थिक स्थितीबाबत चिंतेत आहे. कंपनीने परिस्थिती पाहून महावितरणला केवळ काही सवलती मागितल्या आहेत. बँकांनाही कमी व्याजावर कर्ज देण्याची विनंती केली आहे. ही चर्चा ज्या दिशेने सुरू आहे त्यावरून परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास आहे.
सोनल खुराणा
बिझनेस हेड , एसएनडीएल

Web Title: Involve SNDL employees in Mahavitran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.